शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यातच कालवा सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:45 IST

डाव्या कालवा पिंपरी चुन्नी शिवारातील प्रकार : टेलवरील शिवारात कालव्याचे कामे निकृष्ट

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्याच्या शेत शिवारात जलद गतीने चांदपूर जलाशयाचे पाणी पोहचविण्यासाठी डावा कालवा सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले. टेलवरील पिंपरी चुन्नी शिवारात सिमेंट अस्तरीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. खरीप हंगामातील पहिल्याच सोडण्यात आलेल्या पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसे पोहचणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांची चौकशीची मागणी होत आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याचे शेतीला सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. डावा आणि उजवा या मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर नहराच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. कालव्यात झुडपे वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. टेलवरील शेत शिवारात पाणी पोहोचत नाही. या परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाला करारबद्ध राहत असल्याने पाणी वाटपाची जबाबदारी याच विभागावर येत आहे. 

सिमेंट अस्तरीकरण करण्यात येत असल्याने झुडपे वाढत नाही. पाण्याच्या प्रवाहाला गती येत आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जात असताना यंत्रणा निधीचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य डावा कालव्यावरील पिंपरी चुन्नी शिवारात कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण गत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.

या कालव्यात खरीप हंगामातील पहिले पाणी चांदपूर जलाशयाचे सोडण्यात आले आहे. पहिल्याच पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. सिमेंट अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाला असल्याचे बोलके चित्र या कालव्यावर दिसून आले आहे. जलाशयाचे पाणी मिळत नाही. टेलवरील शेतात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न फसला आहे. कालव्याची स्थिती 'जैसे थे' होणार आहे. 

कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. अनेक कालवे आणि नहराला भगदाड पडले आहे. अलीकडे चांदपूर गावातच मुख्य उजवा कालवा फुटला होता. सिमेंट अस्तरीकरणाचान उपयोग नसल्याचा प्रसंग निदर्शनास आला होता.

आऊटलेटचे दरवाजे उघडेखरीप आणि रब्बी हंगामात जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर आऊटलेटची भूमिका महत्त्वपूर्ण राहत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आऊटलेटचे महत्त्व वाढत आहे. शेतीला सिंचित करताना पाणी शेतात पूर्ण होताच आऊटलेट बंद करण्यात येत आहे. यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यात जात नाही. परंतु आऊटलेटचे दरवाजे खुले असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा