शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पवनी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:23 IST

नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : नगरपालिका सभागृहात तातडीची सभा

ऑनलाईन लोकमतपवनी : नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत. एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या नगरपरिषद साठी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय आहे असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.नगराच्या सीमावाढीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर हर्षोल्लास साजरा करुन शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी न.प. सभागृहात तातडीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी पक्ष निवडणूीपुरता असतो लोकप्रतिनिधींनी निवडणूकीनंतर सर्वांचे काम करावे असा माझा प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच नगरविकास आघाडीची न.प. मध्ये सत्ता असूनही विकासकामासाठी मी सोबत आहे. नगरासाठी स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, भुयारी विद्युत पुरवठा योजना, पर्यटन व शैक्षणिक विकास तसेच पुरातन वस्तू संग्रहालय या लोकहिताच्या कामासाठी मी सदैव तत्पर आहे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलतांना विलासराव काटेखाये यांनी सव्वा वर्षापुर्वी नगर विकास आघाडीचे निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द करुन दिलेल्या वचनांची पूर्तता करणे सुरु केले आहे. नगराची सीमा वाढ हा त्यापैकीच एक महत्वपूर्ण काम असल्याचे सांगून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अ‍ॅड़ रामचंद्र अवसरे, आ.डॉ. परिणय फुके यांचे मौलीक सहकार्य लाभल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पवनीला कृषी महाविद्यालय व शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांनी नगराच्या विकासाचे पर्व सुरु झाले आहे. नगरात स्वच्छतेला महत्व दिले आता स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाइी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शहर काँगे्रसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगरसेविका अनुराधा बुराडे, दिलीप वाणी, डॉ. भागवत आकरे, अशोक पारधी यांनी नगराचे सीमा वाढ प्रकरणी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन अनिल धारगावे यांनी तर आभार शाखा अभियंता मंगेश बोंदरे यांनी मानले. सर्व नगरसेवक नगर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधव व नागरिक यावेळी उपस्थित होते.