भंडारा ‘फडे घ्या फडे’ अशी आरोळी देत गावोगावी फडे विकणार्या महिला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या झाडण्या विकत असल्या तरी लक्ष्मी त्यांच्या घराकडे ढुंकूनही पाहत नाही. पूूर्वी परिसरातील जंगलात सिंदी मुबलक मिळायची. शिंदी तोडून घरी आणायचे. वाळवून काटे झाडणे, त्यांचे झाडू तयार करणे व गावागावात जाऊन विकणे असा हा व्यवसाय आहे. एक महिला दिवसाकाठी २0 ते ३0 झाडू तयार करते. आज १0 ते १२ रुपयाला एक झाडू विकले जातात. आता मात्र शिंदी मिळत नसल्याने बालाघाट येथून शिंदी विकत आणावी लागत आहे. शिंदी झाडाच्या पानापासून तयार होणार्या झाडू, टोपल्यांना बाजारात मागणी आहे. शिंदीचे फोक उपलब्ध होत नसल्याने हा वेतकाम व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. जुन्या काळी कणगीमध्ये धान्य, ज्वारी चार-पाच वर्षापर्यंंत टिकून ठेवत होते. ज्वारीच्या हंगामात ज्वारी घेऊन गव्हाच्या हंगामात गहू घेऊन व्यवसाय करणारे कणगी देत असत. वेअर हाऊस गावागावात झाल्याने आता कणगीला मागणी नसल्याने कणगी तयार करण्यात येत नाही. शिंदीच्या एरवी भंडारा
झाडूने जागा घेतल्याने फडा लुप्त
By admin | Updated: June 2, 2014 00:30 IST