भंडारा : ‘‘तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी’’ अशी जगप्रसिद्ध ओळी आपण नेहमी ऐकत असतो. आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित असलेल्या बापू बाल अनाथ गृहातील विद्यार्थ्यांना थोड्या वेळेसाठी का असेना मायेची ऊब देण्यात आली. ‘जॉय आॅफ गिव्हींग’’ च्या सदस्यांनी हा उपक्रम राबविला. अनाथांना नवीन कपडे, खाऊचे वाटप करण्यात आले. शहरातील ‘जॉय आॅफ गिव्हींग’ ही एकमेव अशी सामाजिक संघटना असून त्यात गरिब, अनाथांना मदत दिली जाते. असा उपक्रम राबविण्याचा मानस यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. अनाथांना मदत करण्याचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष मो.तारिक कुरैशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आज गुरूवारी त्यांच्याच हस्ते पार पडला. येथील मुलांना जॉय आॅफ गिव्हिंगतर्फे मो. कुरैशी यांच्या हस्ते ७० मुला-मुलींसाठी नविन कपडे व खाऊचे वाटप कण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉ. प्रकाश मालगावे यांनी जनतेला जॉय आॅफ गिव्ंिहग’ या सामाजिक कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला भाजप व्यापारी सेलचे नितिन दुरगकर व इंजीनिअर सेलचे आशु गोंडाने, डॉ.प्रकाश मालगावे, अजय सेलोकर, अमोल शहारे, भूपेश तलमले, राजीव देसाई, राहुल मेश्राम, अतुल मानकर, पंकज सुखदेवे, श्रीकांत कुंभारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनाथांना मायेची ऊब
By admin | Updated: June 3, 2016 00:39 IST