शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोंडे ते जिरोला रस्ता सकाळी होतो उंच अन् सायंकाळी पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:50 IST

एखादा रस्ता सकाळी आपोआप तब्बल दीड फुट उंच होतो आणि सायंकाळी पूर्ववत होतो, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. हा प्रकार अनुभवायचा असेल तर साकोली तालुक्यातील बोडे ते गिरोला मार्गावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला जावे लागेल.

ठळक मुद्देऔत्सुक्याचा विषय : रस्ता बांधकामातील गैरप्रकार की वैज्ञानिक चमत्कार?

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : एखादा रस्ता सकाळी आपोआप तब्बल दीड फुट उंच होतो आणि सायंकाळी पूर्ववत होतो, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. हा प्रकार अनुभवायचा असेल तर साकोली तालुक्यातील बोडे ते गिरोला मार्गावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला जावे लागेल. गत काही दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार परिसरात औत्सुक्याचा विषय झाला असून रस्ता बांधकामातील गैरप्रकार की वैज्ञानिक चमत्कार अशी चर्चा परिसरात सुरु आहे. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची येथे वर्दळ दिसते.साकोली तालुक्यातील बोंडे ते गिरोला (जपाणी) या सिमेंट रस्त्याचे बांधकाम गत वर्षी मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत करण्यात आला. या मार्गावर एक मोठे मंदिर आहे. पहाडीवरील मंदिरात जाण्यासाठी भावीक या रस्त्यावर ये-जा करतात. मंदिर साकोलीपासून अवघ्या १० ते १२ किलोमिटर अंतरावर आहे. या मंदिरावर जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावरुन वर्षभरापासून नागरिकांची ये-जा सुरु आहे. मात्र गत पंधरा दिवसांपासून अनोखा प्रकार येथे पहावयास मिळत आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता सकाळी आपोआप दीड फुट उंच होतो. सायंकाळपर्यंत हा रस्ता उंचवट्यासारखा दिसतो. मात्र सायंकाळी हा रस्ता पूर्ववत होतो. या रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे.गत पंधरा दिवसांपासून तापमान ४५ अंशाच्या आसपास आहे. या तापमानामुळे रस्त्यात अशा बदल झाला असावा अशी चर्चा आहे. तर काहीजण या रस्त्याच्या कामातील गैरप्रकारामुळे हा चमत्कार होत असल्याचे सांगत आहे. परिसरात मात्र वेगवेगळ्या चर्चा करीत अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. या प्रकाराची तपासणी करावी आणि नेमके कारण शोधावे अशी मागणी बोडेचे माजी उपसरपंच विकास मेश्राम यांनी केली आहे.सध्या साकोली तालुक्यात हा उंचावणारा रस्ता नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या चर्चांना येथे उत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून सत्य समोर आणावे अशी मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा