शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. निसवण्याच्या वेळी धान तिसर, चौसर निसवत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.विनोद भोपे या शेतकऱ्याने एका कंपनीचे बियाणे विकत घेतले. ते बियाणे बोगस निघाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. पांजरा येथील शेतकरी सुरेश रामटेके यांनी विकत घेतलेले बियाणेही असेच बोगस निघाले. देवधान सहा एकरात कसा तयार झाला याची तक्रार मोहाडी कृषी अधिकाऱ्यांकडे केली. नेरी येथील शेतकरी अख्तरबेग मिर्जा यांच्या शेतातसुद्धा बनावट धान उगवले. खमाटा येथील अनेक शेतकऱ्यांनाही असाच अनुभव आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु कृषी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊनही कृषी विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अख्तरबेग मिर्झा, विनोद भोपे, सुरेश रामटेके, प्रमोद एंलजवार, ज्ञानेश्वर निकुरे आदी उपस्थित होते. बोगस धान विकणाºया कंपनी आणि कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.कृषी केंद्र चालकांना अभय कुणाचे?जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी आहेत. परंतु कृषी विभाग याबाबत बोलायलाही तयार नाही. शेतकरी तक्रार घेऊन जातात, परंतु त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी केंद्र संचालकांचे साटेलोटे सर्वांनाच माहित आहे. यामुळेच कुणी कारवाईसाठी पुढे येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयही डोळ्यावर पट्टी बांधून असल्यासारखे दिसत आहेत. यात शेतकºयांचा मात्र जीव जात आहे.

टॅग्स :agricultureशेती