शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

बेपत्ता अभिकर्त्याचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

अलिम खाँ ईस्माईल खाँ पठाण(४७) रा बारव्हा असे मृतक वसुली अभिकर्त्याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तपास व शोध मोहिम राबविली असता तब्बल महिनाभरानंतर बेपत्ता वसुली अभिकत्यार्चा मृतदेहच आढळला.

ठळक मुद्देघातपाताची शक्यता : दांडेगाव जंगलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एका पतसंस्थेअंतर्गत कार्य करीत असलेला वसुली अभिकर्ता व महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा सोमवारी दांडेगावच्या घनदाट जंगलात मृतदेह आढळला. अलिम खाँ ईस्माईल खाँ पठाण(४७) रा बारव्हा असे मृतक वसुली अभिकर्त्याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तपास व शोध मोहिम राबविली असता तब्बल महिनाभरानंतर बेपत्ता वसुली अभिकत्यार्चा मृतदेहच आढळला.माहितीनुसार, अलिम खाँ पठाण हे १७ जुन रोजी बारव्हा येथुन लाखांदुर येथे स्वत:चे दुचाकी क्रमांक एम एच ३६ ई २८२६ ने गेला होता. यावेळी घरुन निघुन जात असताना त्यांच्या खिशात अंदाजे ५० हजार रुपये रोख रक्कम होती. संध्याकाळी ऊशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. शोधाशोध करुनही माहिती न मिळाल्याने कुटुंबियांनी १८ जुन रोजी दिघोरी पोलीसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली.तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तब्बल महिनाभर तपास चक्रे फिरविली असता अखेर दांडेगाव येथील घनदाट जंगलात दुचाकीसह कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. दांडेगाव वनक्षेञात वनमजुर म्हणुन कार्यरत ए. एन. कुळसुंगे यांना गस्तीवर असताना मृतदहे आढळला. वनमजुराने याची माहिती लाखांदूर वनपरीक्षेत्र कार्यालयासह दिघोरी पोलीसांना दिली. वनपरिक्षेत्राधिकारी आर.एस. दोनोडे, वनरक्षक एस. जी. खंडागळे, वनपाल व्हि. बी. पंचभाई, वनरक्षक जी.डी. हत्ते , बि एस पाटील , ठाणेदार निलेश गावंडे , पो हवा. विष्णु थंडार्ते यांसह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी आढळली दुचाकी व चप्पलज्या ठिकाणी अलिम खाँ यांचा मृतदेह आढळला घटनास्थळापासुन अंदाजे १० ते १२ फूट अंतरावर पठाण यांची दुचाकी आढळली. ५ ते ७ फूट अंतरावर त्यांची चप्पल आढळली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका बांबुच्या झाडालगत आढळुन आला. त्यांची हत्या तर झाली नसावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. शेवटच्या वेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती. यावरून त्यांचा कुणी घात केला नसावा, अशी चर्चा आहे.