शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पालकसभा ठरली वादळी

By admin | Updated: July 10, 2015 01:14 IST

शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विद्यार्थी व पालक शैक्षणिक साहित्य व गणवेश आदींच्या लगबगीमध्ये ....

पालकांमध्ये असंतोष : गणवेष वाटपाचा वाद चिघळलाभंडारा: शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विद्यार्थी व पालक शैक्षणिक साहित्य व गणवेश आदींच्या लगबगीमध्ये असतानाच स्थानिक महिला समाज शाळेच्या प्रशासनाने अचानकरित्या गणवेश बदलल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला असून खुल्या बाजारातून गणवेश खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील महिला समाज शाळा ही नावाजलेली शाळा आहे. या शाळेत गरिबांपासून तर श्रीमंतांची मुले सुद्धा शिक्षण घेतात. प्रत्येक शाळेचा एक स्वतंत्र असा गणवेश असतो. या गणेवशामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांची ओळख होते. मागील दशकभरापासून शाळेचा गणवेश बदलविण्याचा निर्णय यावर्षी शाळा प्रशासनाने घेतला. हा निर्णय दोन वषापुर्वीच घेण्यात आल्याचे पालक सभेत शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयाला पालकांचा कोणताही विरोध नाही. मात्र शाळा प्रशासनाने शहरातील शास्त्री चौकात असलेल्या एका व्यावसायीकाला शाळेचे गणवेश विक्रीचे कंत्राट दिले. एकाच व्यावसायिकाकडे शाळेचा गणवेश उपलब्ध करून दिल्याने एक प्रकारे शाळा प्रशासनाने पालकांवर अन्यायच केला आहे. खुल्या बाजारभावापेक्षा या गणवेशाची किंमत अधिक आहे.काही पालक शाळा सुरू होण्याच्या दोन दिवसापूर्वी सदर दुकानात गेले असता, पालकांकडून एका गणवेशाचे ५५० रुपए तर दोन दिवसांनी त्याच गणवेशाची किंमत काही पालंकांकडून ७५० ते ८०० रुपये घेण्यात आले. काही पालकांनी गणवेशासंदर्भात अन्य दुकानांमध्ये विचारणा केली असता, त्यांना ४०० ते ५०० रुपयांचा हा गणवेश मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. जो गणवेश सदर दुकानदाराकडून दिल्या जात आहे. त्या किंमतीच्या तुलनेत गणवेशाचा दर्जा सुद्धा नाही. या दुकानदारांकडून अधिकचे पैसे घेऊन आर्थिक लूट होत असल्याने पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. याबद्दल उपस्थित पालकांनी मुख्याध्यापिका यांची विचारणा केली. सदर निर्णय शाळा प्रशासनाचा आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावर तोडगा काढण्यासाठी पालकसभा घेण्यात असता ती सभाही वादळी ठरली.गणवेश बदलल्याच्या कारणामुळे महिला समाज शाळेत पालकसभा घेण्यात आली. सभेत २०० च्यावर पालकांनी हजेरी लाऊन पुन्हा गणवेशाचा विषय चर्चेत आणला. एकाच दुकानातून गणवेश खरेदी करण्याची सक्ती न करता खुल्या बाजारातून खरेदी करण्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. परंतु, शाळा प्रशासनाने १४ आॅगस्टपर्यंत त्याच दुकानातून गणवेश खरेदी करण्यास सांगितले. शाळा प्रशासनाने गणवेशाच्या विषयावर तोडगा न काढता सभा गुंडाळल्याने पालकांमध्ये शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. पालक व शाळा प्रशासन आपआपल्या निर्णयावर ठाम असल्याने हे प्रकरण भविष्यात काय वळण घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सभेला संस्था अध्यक्ष गुप्ते, सचिव मोघे, मुख्याध्यापिका चंदेल यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)