शिबिराचे उद्घाटन भाजप ओबीसी मोर्चाचे विदर्भ प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, तर प्रमुख अतिथी कार्यकारिणी सदस्य चामेश्वर गहाणे, भंडारा तालुकाध्यक्ष नीळकंठ कायते उपस्थित होते. यावेळी धारगाव, डव्वा परिसरातील २१५ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यावेळी शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. नीळकंठ कायते यांनी आधुनिक काळ हा धकाधकीचा असून, कुणाला केव्हा रक्ताची आवश्यकता भासणार हे सांगता येणे कठीण झाले आहे. त्यामुळे अन्नदान, वस्त्रदान व रक्तदान करून गरजवंतांना मदत द्यावी. मात्र, गरज नसताना त्या व्यक्तीला दान करणे व्यर्थ आहे. काळाची मर्यादा ओळखून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष नीळकंठ कायते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
डव्वा येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:41 IST