भंडारा : भीषण उन्हाळ्यात एकीकडे इतर झाडे शेवटची घटका मोजत असतानी निसर्गाच्या चमत्कारामुळे वैशाख वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहराला अगदी आग लागल्यासारखी लाल फुले सर्वांचे लक्ष वेधून जातात, याला निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. गुलमोहर हा वर्षातून केवळ एकदाच तोसुद्धा उन्हाळ्यातच फुलतो. मुळचा तो आफ्रीकेतला असून तो नंतर भारतात आला. याचे बॉटनीकल नाव फ्लेमिंग ट्री (वृक्ष) असे आहे. इंग्रज रिकाम्या जागेवर किंवा मैदानावर तथा रस्त्याच्या कडेला या झाडाला लावत होते असा या झाडाचा इतिहास आहे. चिंचेच्या वृक्षासारखी याची पाने अगदी बारीक असतात. हा वृक्ष सहज उगवतो. परंतु तो अगदी कच्चा असतो. उन्हाळ्यात इतर वृक्षांची पाने गळतीच्या मार्गावर असतानी मात्र हा वृक्ष बहरतो हे विशेष. गुलमोहर दोन प्रकारचा असतो. एक लाल व दुसरा पिवळा असतो. बाराही महिने याची चिंचेसारखी पाने गळत असतात. आता उद्यानात गुलमोहरचे वृक्ष सर्वत्र पाहावयास मिळते. असा हा उन्हाळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गुलमोहर पाहुणा म्हणून जरी आला असला तरी तो इथली आता शान ठरत आहे. (नगर प्रतिनिधी)
आल्हाद देणारा ‘गुलमोहर’ बहरला
By admin | Updated: May 9, 2014 23:58 IST