शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह १६ पासून

By admin | Updated: December 15, 2015 00:39 IST

अंधांनी अंधांकडून अंधांकरीता काम करण्याचे काम राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने मागील २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.

गुरव यांची माहिती : २८ वर्षांपासून अंधांसाठी अव्याहत कामभंडारा : अंधांनी अंधांकडून अंधांकरीता काम करण्याचे काम राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने मागील २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. यावर्षी भंडारा येथे २८ वा अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह ‘सामर्थ्य २०१५’ चे राज्यस्तरीय आयोजन दि.१६ ते २० या कालावधीत जलाराम मंगल कार्यालयात करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव, उपाध्यक्ष रघुनाथ बारड यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.माहिती देताना बारड म्हणाले, यापूर्वी २७ जिल्ह्यात अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला. या राज्यस्तरीय अंध कल्याण सप्ताहात राज्यातील ३० अंध शाळा तसेच सर्व शिक्षण अभियान व अपंग एकात्म शिक्षण योजनेतून ५५० विद्यार्थी आपला सहभाग नोंदविणार आहे. यासाठी ब्रेल लिपीतून मराठी, हिंदी व इंग्रजी वाचन, निबंध लेखन, वक्तृत्व, गायन, वादन, काव्यवाचन, कथाकथन, प्रश्नमंजुषा, बुद्धीबळ क्रिकेट व सामूहिक नृत्य व समूह गाण आदी स्पर्धा होणार आहेत.याशिवाय बुधवारला सकाळी शहरातून जनजागृती मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ब्रेल वाचन, लेखन, संभाषण, संगणकावर काम करणे, सुईमध्ये दोरा ओवणे, विणकाम, गायन, वादन, टेलिफोन डायलिंग, नोटा ओळखणे आदी कौशल्याचे प्रात्याक्षिक राहणार आहेत. अध्यक्ष गुरव म्हणाले, या सामर्थ्य २०१५ च्या माध्यमातून सर्व निवासी अंध शाळा, एकात्म शाळा व सर्व शिक्षा अभियानाअंग्तर्गत अंधांना शिक्षण देणाऱ्या शाळातून गुणात्मक शिक्षण दिले जावे. अंधांना विद्या शाखांमध्ये विनासायास प्रवेश मिळेल असे धोरण तयार व्हावे, अंधांना नोकरी ताना अनुभवाची अट शिथिल असावी, नैसर्गिक अंध तसेच पुर्णत: अंध व्यक्तींना संधी देऊन एक टक्का अंधांचा अनुशेष विना विलंब भरून काढावा, खाजगी क्षेत्रातही अंधांसाठी आरक्षण असावे, शैक्षणिक अहर्तेप्रमाणे अंध व्यक्तींना अनुकंपा धोरणानुसार नोकरीत सामावून घ्यावे, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या अंधांना दोनशे वर्गफूट जागा द्यावी, अंध फेरीवाले व्यक्तीसाठी बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या असल्याचे सांगितले.पत्रपरिषदेला उपाध्यक्ष राजू भगत, महासचिव वसंत हेगडे, कोषाध्यक्ष हरी भालेराव, सचिव प्रकाश पंडागळे, सचिव पांडूरंग ठाकरे, महासचिवर रेवाराम टेंभुर्णेकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)