शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:35 IST

एकेकाळी कुबेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसर शहराला अतिक्रमणाची नगरी म्हणून संबोधले जायचे. परंतू नगर परिषदेच्या पुढाकाराने बाजार परिसरातील अतिक्रमण काढून त्या जागेवर नाल्या, .....

ठळक मुद्देनगर परिषदेचा पुढाकार : शहरात झाली पार्किंगची व्यवस्था

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकेकाळी कुबेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसर शहराला अतिक्रमणाची नगरी म्हणून संबोधले जायचे. परंतू नगर परिषदेच्या पुढाकाराने बाजार परिसरातील अतिक्रमण काढून त्या जागेवर नाल्या, रस्ते व सुभोभीकरणावर भर दिल्याने गजबजलेल्या बाजार पेठेने आता मोकळा श्वास घेतला आहे.तुमसर शहराला अतिक्रमण ग्रासले होते. त्यामुळे शहराचे नियोजन व विकासाची कामे ठप्प पडली होती. ही बाब जाणून घेत नगर परिषदेने व बाजार परिसरातील अतिक्रमण काढण्यावर भर दिला. यापूर्वी अतिक्रमण काढण्यात आले नव्हते असे नाही. परंतू ते नियोजन नसल्यामुळे बाजारपेठ जशीच्या तशीच होत गेली. याहीवेळेस तसेच होणार असे सर्वानाच वाटत होते. परंतु नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व त्यांच्या चमुने वेळीच नियोजन करून अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेवर नाली बांधकाम रस्ते बांधकाम, सुशोभिकरण तसेच दुकानदारांना आवश्यक सेवा पुरवून बाजारपेठ परिसराला मोकळे केले.एवढेच नव्हे तर नियोजन कार्यान्वित करण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनाकरिता पार्किंगची जागा नियोजित करण्यात आली. त्यात संताजी समाज मंदिरचा बाजुचा मैदान, मोर हिंदी शाळा व पोस्ट आॅफिस समोरील रिकामी जागा ट्रेझरी कार्यालयाच्या बाजुची जागा या जागा येथील मंगळवारचा आठवडी बाजार लक्षात घेऊन पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण दिशेतील जागेत आपले दुचाकी व चारचाकी वाहन उभे करू शकणार आहेत. बाजाराच्या दिवशी किंवा इतरही दिवशी शहरात तथा बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीस तसेच रहदारीस नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे.शहराचे योग्य नियोजन राखणे व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने न.प. ने हा केलेला छोटासा प्रयोग आहे व त्यात आम्ही यशस्वीही झालोत याचे अभिमान आहे.-प्रदीप पडोळे,नगराध्यक्ष तुमसर.