शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

गारपिटीचा पुन्हा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:05 IST

जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला बसला असून पाचगाव येथील फळबाग गारपिटीने उध्वस्त झाली. अनेक ठिकाणी गारांचा खच पडलेला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस : आंब्यांसह भाजीपाल्याचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला बसला असून पाचगाव येथील फळबाग गारपिटीने उध्वस्त झाली. अनेक ठिकाणी गारांचा खच पडलेला होता.जिल्ह्यात बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह टपोर थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. भंडारा शहरात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच मेघ गर्जनेसह टपोर थेंबाचा पाऊस बरसू लागला. पावसासोबत तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव सुरु झाला. तब्बल अर्धा तास सुरु असलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. वादळामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर तब्बल दोन तास वीज पुरवठाही खंडीत झाला होता. साकोली तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला. सायंकाळी झालेल्या या पावसाने मोठे नुकसान झाले.मोहाडी तालुक्याला गारपिटीचा फटकामोहाडी : मोहाडी परिसरात १५ ते २० मिनिट गारांसह वादळी पाऊस झाला. कान्हळगाव, खमारी, मांडेसर, सिरसोली, हरदोली, मोरगाव, मोहगाव (देवी), पारडी आदी गावात गारांसह पाऊस बरसला. या परिसरात गव्हाचे मोठ्या प्रमाणात पीक असून गारपिटीने गहू उध्वस्त झाला. चना पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोरगाव परिसरात वाळण्यासाठी टाकलेल्या मिरच्याही गारपिटीने ओल्या झाल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.पाचगाव येथे गारांचा खचवरठी : मोहाडी तालुक्यातील वरठी परिसराला गारपिटीचा प्रचंड तडाखा बसला. पाचगाव येथील माजी सरपंच व माजी उपसभापती कमलेश कनोजे यांची फळबाग गारपिटीने पूर्णत: उध्वस्त झाली. शेतात सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसत होते. भोसा टाकळी परिसरातही गारपिटीने मोठे नुकसान झाले. मोहगावसह अनेक ठिकाणी बोर आणि आवळ्याच्या आकाराची गार पडली. या गारपिटीच्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत.होळीच्या उत्साहावर विरजणजिल्ह्यात सर्वत्र होळी सणाचा उत्साह सकाळपासून दिसत होता. गावागावात होळी पेटविण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती. मात्र दुपारी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले. होळी पेटविण्यासाठी आणलेले लाकडे ओली झाली होती.