शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बियाणांच्या काळाबाजाराचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:45 IST

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रमाणित बियाणे प्रकरणात मागील अनेक वर्षापासून कोट्यवधीचा गैरव्यवहार होत असून...

शेतकरी हवालदिल : कृषी विभागाचे दुर्लक्षशिवशंकर बावनकुळे साकोलीशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रमाणित बियाणे प्रकरणात मागील अनेक वर्षापासून कोट्यवधीचा गैरव्यवहार होत असून विक्रेते काळाबाजार करीत आहेत. कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.महाबीजचे बियाणे सध्या बाजारात उपलब्ध आहे. बियाणे प्रमाणित करण्याकरिता जो खर्च केला जातो. त्यापेक्षा १०० टक्के जास्त आकारणी करुन विक्रीस उपलब्ध करण्यात येत असून दरवर्षी कोट्यवधी रुपयाची लुट करण्यात येत आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ५०० ते ७०० बीज उत्पादक शेतकरी धान बियाणे उत्पादित करीत असतात. महाबीज या शेतकऱ्याच्या मार्फत धान बियाणे उत्पादित करते. त्याचकडून धान खरेदी करताना २० टक्के जास्त देण्यात येतात. सध्या जयश्रीराम व एच.एम.टी. धान बियाणाची मागणी जास्त आहे.महाबीज भंडारा जिल्हा व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्रीरामचा बाजार भाव २००० ते २२०० रुपये प्रति क्विंटल आहे. महाबीज त्याच्या अधिकृत धान उत्पादक (बीजोत्पादक) शेतकऱ्यांना २० टक्के ज्यादा भाव देवून धान खरेदी करते. याचा अर्थ २६४० रुपये प्रति क्विंटल धान खरेदी केल्यानंतर यावर प्रक्रिया केली जाते. त्याचा खर्च प्रोसेसिंग २०० रुपये प्रति किलो वाहतूक खर्च ५० रुपये प्रति क्विंटल प्रशासिंग खर्च २०० रुपये प्रति क्विंटल अशाप्रकारे ३०५० रु. प्रति क्विंटलप्रमाणे धान बियाणे विक्रीस तयार होते. तेच प्रमाणित बियाणे विक्रेत्यांना चार हजार ४८ रुपयेप्रमाणे पुरवठा करण्यात येतो. त्यावर सहा हजार अधिकतम खुदरा मूल्य अंकित करण्यात येतात. १० किलोच्या बॅगमध्ये पुरवठा करण्यात येतो. ६०० रुपयाच्या बॅगचासुध्दा ६८० ते ७०० रुपयापर्यंत विकून काळा बाजार साकोलीमध्ये होत आहे. याची कृषी विभागाला माहिती नसल्याचा देखावा करण्यात येतो. त्यांना विचारणा केली असता त्याचा सल्ला उल्लेखनीय असतो. तुम्हीच पकडून द्या काळाबाजार झाल्याची. रसीद दाखवा. त्या दुकानदाराचा परवाना त्वरित रद्द करतो. दुकानदार इतका मूर्ख नाही. तो काळा बाजाराने विक्री केलेल्या बियाण्याची रसीद देईल.महाबीजच्या जयश्रीरामचे धान बियाणे सर्व प्रक्रिया केल्यानंतर ३०५० रु. प्रति क्विंटल पडतो त्याची बाजारभाव किंमत सहा हजार, सुमारे ३००० रुपयांचे धान बियाणे सहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे १०० टक्के नफा हे शासनाच्या कोणत्या नियमानुसार केले जाते. सध्या भंडारा जिल्ह्यात महाबीजचे १० हजार क्विंटल बियणे विविध प्रकारचे उपलब्ध आहेत. याचा अर्थ ३००० रुपये प्रति क्विंटल १० हजार क्विंटलवर कोट्यावधीचा गैरव्यवहार हा मागील अनेक वर्षापासून होत आहे. याला शासनाचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.कृषी विभागाचे ग्राम बीजोत्पादन उपक्रम बंद पडलेला आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यावर प्रक्रिया केली असता. महाबीज व खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याची करोडो रुपयाच्या होत असलेल्या गैरव्यवहारावर आळा बसेल.भात पैदासकार कृषी संशोधन केंद्र कुंभली यांनी दिलेल्या माहितीनुसार १०० लीटर पाण्यामध्ये ३ किलो मिठाच्या द्रावणात धान बियाणे घालुन खरा, पीचर धान निघून जातो. एक क्विंटल धान द्रावणात घातल्यानंतर १ ते दिड किलो धन कमी होतो. स्वच्छ पाण्याने तीन-चारदा धुतल्यानंतर थायरस १५० ते २०० रुपये खर्च बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यात. सेप्ट्रोस्कायलीन ७०-८० रुपये प्रति क्विंटल खर्च योते. जयश्रीराम बाजारभाव किंमत २२०० रुपये प्रति किलो मिठ ३० अधिक थयरस १५० ते २०० रुपये सेप्ट्रोस्कालीन ७० रुपये एकंदरीत प्रक्रिया खर्च प्रति क्विंटल ३०० रुपये बाजारभाव २२०० रुपये व खर्च २५०० रुपये शेतकरी स्वत: प्रमाणित बियाणे तयार करु शकतो. कृषी विभाग शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यात अपयशी ठरले. हीच परिस्थिती सर्व बियाण्याच्या जातीवर लागू आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या वतीने अनुदानावर मिळणाऱ्या धान बियाण्याचे भाव शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे नाही यामुळे या योजनेतील बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरविली आहे. मागील वर्षी वर्ष २०१५-१६ या हंगामात महाबीजने १५ हजार क्विंटल धान बियाणे बाजार होते. यावर्षी वर्ष २०१६-१७ या हंगामात दहा हजार क्विंटल धान बियाणे विक्रीस उपलब्ध आहे. दिवसेंदिवस विविध खासगी कंपन्या व महाबीजचे बियाणे घेण्यास शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्याकडे बियाणे उपलब्ध नाही. बाजारातून घेण्याची क्षमता नाही. बियाण्याचे भाव आर्थिक कुवतीबाहेर असल्याने या याजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. कृषी विभागाने नियोजन करताना अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकऱ्याचा विचारच केला नाही. फक्त संपन्न शेतकऱ्यांचा विचार केला. कृषि विभागाने स्थानिक परिस्थितीचा विचार केला नाही. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदीबाबत संभ्रमात दिसत आहे. यशोधा कंपनीच्या संदर्भात तक्रारी आल्या आहेत. तालुका व पंचायत समितीस्तरवर याची कमेटीची स्थापना केली आहे. काही नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ते आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल.- जी. के. चौधरी,तालुका कृषी अधिकारी, साकोली.