शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५ आॅगस्ट रोजी पाळणार ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:25 IST

जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्न प्रशासनाने गांर्भियाने घेतलेला दिसून येत नाही. विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित जागी हलविण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. याउपर या वर्षीच्या ८० जागांच्या प्रवेश परिक्षेचा निकाल आज पावेतो घोषित करण्यात आलेला नाही. परिणामी १५ आॅगस्टच्या दिवशी काळा दिवस उपोषणस्थळी पाळण्यात येणार आहे अशी घोषणा पत्र परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देप्रकरण जवाहर नवोदय विद्यालयाचे : प्रवेश परीक्षेचा निकाल लागेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्न प्रशासनाने गांर्भियाने घेतलेला दिसून येत नाही. विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित जागी हलविण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. याउपर या वर्षीच्या ८० जागांच्या प्रवेश परिक्षेचा निकाल आज पावेतो घोषित करण्यात आलेला नाही. परिणामी १५ आॅगस्टच्या दिवशी काळा दिवस उपोषणस्थळी पाळण्यात येणार आहे अशी घोषणा पत्र परिषदेत करण्यात आली.नवोदय विद्यालय संदर्भात रविवारी उपोषणस्थळी पत्र परिषद घेण्यात आली. पत्र परिषदेला नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रविण उदापूरे, उपोषणकर्ते पालक व आंदोलक भाऊ कातोरे, विलास मोथारकर, प्रहार संघटनेचे मंगेश वंजारी यांनी संबोधित केले.विशेष म्हणजे आजच्यापत्र परिषदेला नवोदय विद्यालयात अध्ययनरत विद्यार्थी सुध्दा उपस्थित होते. राहण्यास अयोग्य असलेल्या जकातदार कन्या शाळेच्या आवारात शिकत असलेल्या नवोदयाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला. सध्या ज्या ठिकाणी गरीब होतकरु विद्यार्थी शिकत आहेत. ती इमारत मोडकळीस आलेली आहे. असा अहवाल खुद्द प्रशासनानेच दिला आहे. तेव्हा ईमारत ढासळून विद्यार्थ्यांची जीवीत हानी झाल्यास यास सर्वस्वी जबाबदार भंडाराचे जिल्हाधिकारी राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. उपोषणस्थळी निर्वाचित लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही.नवोदय विद्यालयाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये मंगळवार १४ आॅगस्ट रोजी बंद करणार असल्याचे नागपूर विद्यापीठ छात्र संघाचे सचिव आकाश थानथराटे तसेच सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले. पालक लक्ष्मण निंबार्ते, शशिकांत देशभ्रतार, गणेश चेटुले, सविता हटवार, भाग्यश्री चेटूले, कोमल गजभिए, शालिनी झोडे, योगीता लांजेवार, सुरेखा पाखमोडे, महेंद्र कठाणे आदी उपस्थित होते.