शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भाजपचा संविधानविरोधी अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:28 IST

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार संविधानविरोधी असल्याचे चित्र आता समोर येत आहे. २०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याचा भाजपचा अजेंडा आहे. मात्र भाजपाचे हे प्रयत्न कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : पटोलेंचा राजकीय गेम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार संविधानविरोधी असल्याचे चित्र आता समोर येत आहे. २०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याचा भाजपचा अजेंडा आहे. मात्र भाजपाचे हे प्रयत्न कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, राज्यातील सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर टिकून आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली असती तर जार्इंट किलर ठरले असते. मात्र काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार देऊन भाजपचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांचा विजय सोपा केला आहे.नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार असते आम्ही आपला उमेदवार रिंगणात नसता. आता भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने पटोलेंचा राजकीय गेम करीत आहे. आपला पक्ष राष्ट्रवादीला कधीही पाठिंबा देणार नाही. येत्या निवडणुकीत आपण कुणासोबत या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नसली तरच आपण पाठिंबा देऊ, असेही स्पष्ट केले. सर्वच राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे, असे वाटत असते. परंतु आज वेगळी परिस्थिती आहे. राष्ट्रीय पक्षावर लोकांचा भरवसा राहिलेला नाही. या पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराची भाजपशी लढत राहील, असेही त्यांनी सांगितले.इंदिरा गांधींच्या काळात अघोषित आणीबाणी होती. मोदी सरकारने घोषित करून आणीबाणीची परिस्थिती आणली आहे. आता संघटित मतदार हा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे होणाºया धनगर समाजाच्या संमेलनातून वेगळ्या समिकरणाची नांदी दिसून येईल, असे स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भारिपचे उमेदवार अ‍ॅड. लटारी मडावी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय उपस्थित होते.