महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ओबीसी आयोग नेमून इम्पेरिकल डाटा तयार करावा, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत बाजू मांडून समाजाला न्याय मिळवून द्यावा, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशांत खोब्रागडे, कोमल गभने, अरविंद भालाधरे, मुकेश थानथराटे, नितीन कडव, विकास मदनकर, कृष्णकुमार बत्रा, नारायण गोपागोनिवार, शेरुभाऊ भुरे, हेमंत बांडेबूचे, महेंद्र निंबार्ते, नगरसेवक रुबी चड्डा, आशू गोंडाने, मंगेश वंजारी, मिलिंद मदनकर, पप्पू भोपे, अजिज शेख, कैलास तांडेकर, मधुरा मदनकर, वनिता कुथे, शमीमा शेख, गीता सिडाम, वर्षा साकुरे, माला बगमारे, रोशनी पडोळे, स्नेहा श्रावनकर, प्रीती गोसेवाडे, अनुप ढोके, रोशन काटेखाये, भपेश तलमले, शैलेश मेश्राम, अमित बिसने, अरविंद ढोमने, अमोल शहारे, करम वैरागडे, विष्णुदास हटवार, कायते, सोनू कळंबे, विजय गभने आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST