लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या आश्वासनाला चार वर्षे लोटूनही अंमलबजावणी केली नाही. येणाऱ्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजबांधवांच्या उपोषणाची सांगताप्रसंगी केले.धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले. मात्र सात दिवस होऊनही उपोषण मंडपाला शासनाचा कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी डॉ. विकास महात्मे यांनी सत्ताधारी पक्षाने समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ करावी अन्यथा आंदोलन तीव्र होईल. मिळालेली खासदारी ही समाजाची आरक्षणाची टोकण आहे. ते आरक्षण आम्ही घेणारच असे सांगितले. उपोषणकर्त्यामध्ये राजकुमार मरठे, जयशंकर घटारे, सोनु हातेल, दिनेश अहिर, राजेश पेरे, उमेश हातेल, मंगलदास खऊळ यांचा समावेश होता. तत्पुर्वी उपोषणकर्त्यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सोपविले.यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. बर्डे, वंदना बर्डे, प्रा. निलू लूचे, राकेश पाटील, उमेश अवघड, राजकुमार मरठे, विद्या पांडे, प्रकाश हातेल, देविदास चाफले, किसन थाटकर, प्रा. शंकर गायकी, विजय मुकूर्णे, मारोती गोमासे, प्रमोद फोपसे, ओमप्रकाश पडोळे, विजया चाफले, शुभांगी पडोळे, सुरेश कवाने आदी मान्यवर उपस्थित होते.
धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचा भाजपला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:42 IST
भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या आश्वासनाला चार वर्षे लोटूनही अंमलबजावणी केली नाही. येणाऱ्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजबांधवांच्या उपोषणाची सांगताप्रसंगी केले.
धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचा भाजपला विसर
ठळक मुद्देविकास महात्मे यांचा घरचा अहेर : लिंबूपाणी पाजून केली उपोषणाची सांगता