शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:51 IST

भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जुमलेबाजांना जनताच धडा शिकविणार, आसगाव परिसरात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. परिणामी लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यापासून वंचित असून शेतकऱ्यांचे समृध्द होण्याचे स्वप्न या सरकारने या प्रकल्पासाठी लागणार निधी रोखून पूर्ण होवू दिले नाही. केवळ विकासाच्या नावावर गप्पा मारणाºया भाजपा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून जतनाच त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यातील आसगाव, भागडी, विरली, मांगली चौरस, कोंढा, कोसरा, चिचाड, पवनी व भुयार येथे शनिवारी (दि.३०) आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, मनोहर राऊत, नरेश दिवटे, बल्लु चुन्ने व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.प्रफुल्ल पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कोणती विकास कामे केली हे सांगण्याची गरज नसून जनतेलाच ती माहिती आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प पूृर्ण करणे हे आपले स्वप्न आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाच्या बाबातीत समृध्द होतील. त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न होता.मात्र भाजपा सरकारने या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला नसल्याचा आरोप केला.बावनथडी, धापेवाडा हे प्रकल्प या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करणे तर दूरच राहिले उलट नागपूर शहरातील घाण पाणी नाग नदीच्या माध्यमातून या प्रकल्पात सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपण भेल प्रकल्प मंजूर केला मात्र भाजप सरकार सत्तेवर येताच भेल प्रकल्प सुरू करण्याऐवजी तो बंद पाडला.परिणामी हजारो बेरोजगारांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जनतेनीच काय योग्य आहे ते ठरवून सजग राहू मतदान करावे. नाना पंचबुध्दे म्हणाले, भाजप सरकारने ना शेतकºयांसाठी ना बेरोजगार युवकांसाठी काही केले नाही.उलट मोठ मोठ्या योजनांची घोषणा व जुमलेबाजी करुन केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला जनतेनीच बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल