शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:55 IST

निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : साकोलीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्युज नेटवर्कसाकोली : निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. भाजप सरकारने शेतकºयांवर सातत्याने अन्याय केला आहे. आता सत्ता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या साकोली शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे, अनंतराव घरड, आ.गोपाल अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, डॉ.अजय तुमसरे, सीमा भुरे, सभापती रेखा वासनिक, ताराबाई तरजुले, सविता ब्राम्हणकर, पं.स. सदस्य छाया पटले, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, रेखाताई समरीत, मनोज बागडे, प्रमिला कुटे, माजी सभापती केवळराम लांजेवार, अंजिरा चुटे, उमेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते व या संघर्ष यात्रेचे साकोलीचे आयोजक माजी आमदार सेवक वाघाये उपस्थित होते.धानाला प्रती क्विंटल २५०० रु. हमीभाव, सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यांना घेऊन कॉंग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही यात्रा होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे सायंकाळी पोहचली. या यात्रेला हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, दोन वर्षात जर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो तर राममंदिर का नाही? असा प्रश्न जनतेनीच आता सरकारला विचारला पाहिजे, महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले भाजप सेना जरी एकमेकावर टीका करीत असले तरी दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही चव्हाण म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उमेश कठाणे, दिलीप मासूरकर, विजू दुबे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे, उमेश भुरे, मनोहर डोंगरे, हेमंत भारद्वाज, दीपक रामटेके व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांनी तर आभार तालुका अध्यक्ष नंदू समरीत यांनी केले.वाघायेंची उमेदवारी पक्कीयात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, ‘सेवकभाऊ’चिंता करू नका. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तुमची उमेदवारी निश्चित असून तुम्ही बिनधास्त कामाला लागा. असे सांगून सभेतच वाघाये यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात व काँग्रेसच्या गोटात चर्चा सुुरु झाली आहे.