शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा उमेदवार घोषित, राष्ट्रवादीचा गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:04 IST

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावावरुन गत महिन्याभरापासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना भाजपाने रविवारी पुर्णविराम दिला. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी घोषीत केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यातच होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करुन शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

ठळक मुद्देदिवसभर तर्कवितर्क : राष्ट्रवादी, भाजपा दाखल करणार आज नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावावरुन गत महिन्याभरापासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना भाजपाने रविवारी पुर्णविराम दिला. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी घोषीत केली. तर राष्टÑवादी काँग्रेसचे नाव रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यातच होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करुन शक्ती प्रदर्शन करणार आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात गत महिन्याभरापासून राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांच्या नावावर तर्कवितर्क लावले जात होते. नामांकनाचा शेवटचा दिवस जवळ आलातरी भाजपा आणि राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंतही निश्चित झाला नव्हता.राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी १ वाजतापासून बैठक सुरु होती. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील महत्वपुर्ण नेते उपस्थित होते. सायंकाळपर्यंत उमेदवाराच्या नावावर खल करण्यात आला. परंतु अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे वृत्तवाहिन्यांवर विविध नावे झळकत होती. पंरतु राष्ट्रवादीकडून अधिकृत दुजोरा दिला जात नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर तर्कवितर्क लावले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचे नामांकन सोमवारी दाखल केले जाणार आहे. भंडारा येथील जलाराम मंगल कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ होईल. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.रविवारी सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांवर भाजपाचे उमेदवार म्हणून सुनील मेंढे यांचे नाव झळकत होते. परंतू त्याला कुणीही अधिकृत दुजोरा देत नव्हते. अखेर सायंकाळी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून भंडारा-गोंदियासाठी सुनील बाबुराव मेंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.भाजपाच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचे सचिव जगदप्रसाद नड्डा यांनी छत्तीसगढ, मेघालय आणि महाराष्ट्रातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. या यादीत महाराष्ट्रातील एकमेव भंडारा-गोंदियाचे सुनील मेंढे यांचा नावाचा समावेश आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या विविध चर्चांना पुर्णविराम मिळाला.भाजपा-सेना युतीचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करणार आहे. यावेळी भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, म्हाडाचे अध्यक्ष तारीक कुरेशी, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार गिरीश व्यास, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, हेमंत पटले, बाळा अंजनकर उपस्थित राहणार आहेत.नामांकनातून शक्तीप्रदर्शनलोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालविली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार २५ मार्च हा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत केवळ ६ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारपर्यंत ९६ उमेदवारांनी २१५ अर्जांची उचल केली होती. आता त्यापैकी कितीजण नामांकन दाखल करणार हे सोमवारीच कळणार आहे. दोन्ही पक्ष मिरवणुकीद्वारे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित नामांकन दाखल करणार आहे.