शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानात बायोमेट्रिक सेवा बंद; लाभार्थ्यांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:42 IST

Bhandara : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना शासन दर महिन्याला रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप करते, मात्र या महिन्यातही ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे बायोमेट्रिक मशीन काम करत नाही. तांत्रिक अडचणी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रशासनाने मशीनमध्ये असलेला दोषाचे निवारण करून जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता राशन दुकानदार संघटनेतर्फे अध्यक्ष सुनील जग्या यांच्या नेतृत्वात तहसीलदार नीलेश कदम यांना निवेदन देण्यात आले.

रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणासाठी सरकारने बायोमेट्रिक प्रणाली लागू केली आहे. परंतु, ही बायोमेट्रिकप्रणाली रेशन दुकानदार आणि ग्राहकांसाठी कायम अडचणीची ठरत आहे. शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक अंगठा घालणे बंधनकारक करण्यात आले. थंब लावण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण रेशन दुकानांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरवर्डची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन साकोली तहसील स्वस्त धान्य दुकानदार यूनियनतर्फे तहसीलदार नीलेश कदम यांना देण्यात आले. यावेळी राशन दुकानदार संघटनेचे सुनील जगिया, सचिव मनोहर लंजे, सखाराम इचरी, राजू मरसकोले, निशिकांत समरीत, कोमल हातझाडे, बाळू रहांगडाले, आशिष बोरकर, निर्मला भालेकर, सुनीता खंडाते, लता बोरकर, विमल मेश्राम, घनश्याम शेंडे, नरेश नागरीकर, विलास बावनथडे, विनायक भेंडारकर, शेखर रामटेके उपस्थित होते.

ग्राहकांना माघारी परतावे लागतेदिवसेंदिवस रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणात ग्राहक धान्य आणण्यासाठी येत असून त्यांना परत जावे लागत आहे, तर नुकतीच शेतीची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे मजुरांना पुन्हा पुन्हा माघारी जावे लागत असल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आपापसात संघर्ष. मात्र धान्य न मिळाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा