शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जैव-विविधता समित्या केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 00:35 IST

जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये

आलेसूर : जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसभेतून जैवविविधता समित्या स्थापित करण्यात आल्या. मात्र आजता गायत ग्रामपंचायतीमध्ये एकही नियोजन व मुखातून वाचता काढण्यात आली नाही. परिणामी सद्यस्थितीत जैव विविधता समिती म्हणजे काय, हा थेट अधिकारी व पदाधिकारी यांनाच विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे समित्या केवळ कागदावर जिवंत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केंद्र शासनाने २००२ मध्ये जैव विविधता कायद्याची स्थापना केली व २००३ मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणामुळे २००४ मध्ये जैवविविधता संबंधीचे नियम स्विकारण्यात आले. भारतात खऱ्या अर्थाने जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे देश पातळीवर राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण, राज्यपातळीवर राज्य जैव विविधता मंडळ व स्थानिक पातळीवर जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली. काही अधिकार व कर्तव्य सोपविण्यात आले. कर्तव्यात जीव सृष्टीतील विविधता टिकवून त्यांचे रक्षण करणे जैविक संपदा अगर कायम राहतील अशा रितीने त्यांचा वापर करणे अशा स्त्रोतांच्या वापरातून जे लाभ निर्माण होतील त्यात संबंधीताना सम समान वाटा देणे, अधिकारात स्थानिक नागरिकाव्यतिरिक्त इतर नागरिकाद्वारे जैव विविधता वापर अणि संकलन करण्यावर बंदी. जैवविविधता वापरण्यातून मिळणारा लाभ तंत्रज्ञानाचा वापर संशोधन विकास जैविक संपदा याचे सामुदायीक व्यवस्थापन, वन व वनालगत नागरिकांना जैव संसाधने, त्यांची माहिती आणि वापरासंबंधी शुल्क वसुल करण्याचा अधिकार, जैव, तंत्र आणि जिवाणुचे वापरावर नियंत्रण आदी अधिकार व कर्तव्य प्राप्त झाली आहेत. प्रत्येक गावाच्या हद्दीत येणारे शेतीविषयक पारंपारिक ज्ञान विविध प्रकारची पिके, वन औषधी, वैदुकिंवा भुमक यांचे ज्ञान, जंगलाबद्दल माहिती, विविध प्रकारच्या वनस्पतीच्या वापराबाबत माहिती वन्य जीवांची माहिती, म्वन व वनातील गौण वन उपज संपदा, जलचर किंवा उभयचर जीवांची माहिती यासर्व प्रकारांची नावानिशी नोंद करण्याची प्राथमिकता या जैवविविधता नोंदवहीमध्ये करणे अनिवार्य आहे. गावातील कोणत्याही जैविक साधन संपत्तीचा वापर गावाच्या परवानगी शिवाय होणार नाही. अशा सबब बाबीची नोंद आवश्यक आहे. (वार्ताहर)