लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या म्हातारीने आपली जरतारी पण फाटकी वस्त्रे जपून ठेवावीत त्याप्रमाणे झाडीबोली चळवळीने या बोलीचे महत्त्व, उपयोगिता पटवून दिली आहे. बोली जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीने केले आहे, असे प्रतिपादन रौप्यमहोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारा जवाहरनगर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित झाडीबोली साहित्य मंडळाच्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनात ते बोलत होते. उद्घाटन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात, राष्ट्रीय बालगोष्टीचे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड, डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे, नरेश देशमुख, डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे, प्राचार्य अजय मोहबंसी व सर्व पुर्वाध्यक्ष उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास कथन केला डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले. पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे यांनी अनुभव कथन केल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले.याप्रसंगी उत्तराखंडचे उदय किरोला आणि गुजरातचे मोतीभाई नायक यांनी स्वप्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी ‘झाडीगौरव’ गीतांचे गायन केले. संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अजय मोहबंसी यांनी केले.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
झाडीबोली चळवळीने बोली जीवंत ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:21 IST
बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल.
झाडीबोली चळवळीने बोली जीवंत ठेवली
ठळक मुद्देसंमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर : रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन