शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बिडी उद्योगावर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात विडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात गोंदिया, जबलपूर आणि कामठी येथील तीन नामांकित कंपन्याचे विडी कारखाने होते. बहुतेक सर्व तालुक्यांच्या ठिकाणी त्यांचे स्टॉक असायचे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसह कंत्राटदार संकटात : हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो विडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नामांकित विडी कंपन्यांनी त्यांचे जिल्ह्यातील कारखाने बंद केले असून, मजुरांसह कारखान्यातील कर्मचारी आणि कंत्राटदारांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात विडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात गोंदिया, जबलपूर आणि कामठी येथील तीन नामांकित कंपन्याचे विडी कारखाने होते. बहुतेक सर्व तालुक्यांच्या ठिकाणी त्यांचे स्टॉक असायचे. गावागावात या कंपन्यांनी कंत्राटदार नियुक्त केले होते. मजुरांना तेंदुपाने, तंबाखू आणि सुताचा पुरवठा करायचा व मजुरांनी तयार केलेल्या विड्या घेऊ न त्या कारखान्यात पुरवायच्या, असा हा उद्योग दोन्ही जिल्ह्याच्या शेकडो गावात पसरला होता. या मजुरांना एक हजार विड्यांसाठी २५ ते ४० रुपयांपर्यंत मजूरी दिली जायची. मोठया कंपन्याचे बंदर बॅग, संजीव आणि असेच अनेक ब्रँन्ड होते. स्थानिक पातळीवरही गेंडा, टायगर, चिता या नावाने काही काही लघु उद्योगही उभे झाले होते. ग्रामीण भागातील बहुतेक कुटूंब विड्या वळण्याच्या व्यवसायात असायचे. यातूनच त्या कुटूंबाचा आर्थिक गाडा रेटला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षात विडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे. बहुतांश सर्वच कारखाने आणि स्टॉक बंद झाले आहेत. परिणामी, कारखान्यात कार्यरत कर्मचारी, व्यवस्थापक आणि कंत्राटदारही रस्त्यावर आले आहेत. कारखानेच बंद झाल्याने हजारो मजुरांवरही आर्थिक संकट कोसळले आहे.तेंदूपत्ता हा विडी व्यवसायातील महत्वाचा घटक आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता मिळत असून, याच जिल्ह्याच्या जंगलव्याप्त भागात नक्षलवादी चळवळ फोफावली आहे. तेंदूपाने तोडणाºया कामगारांनी मजुरी वाढविणे, तेंदू ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणे, त्यांचे ट्रक जाळणे, प्रसंगी मारहाण करणे अशा मार्गाचा नक्षलवाद्यांनी अवलंब करणे सुरू केले आहे. नक्षल्यांची नाराजी ओढवून कोणत्याही तेंदूपत्ता ठेकेदार जंगलातून पाने गोळा करू शकत नाही किंवा वाहतूक करू शकत नाही. परिणामी, विडी कारखानदारांना चढ्या दरात तेंदूपत्ता विकत घ्यावा लागतो. इतके सारे करुनही विड्यांना मागणी नसल्याने तसेच भाव मिळत नसल्याने कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.विविध कारणांचा उद्योगाला फटकाभंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी घराघरात पोहोचलेला विडी वळण्याचा व्यवसाय मोडकळीला आणण्याला शासनाच्या धोरणाबरोबरच नक्षलवादी चळवळही कारणीभूत आहे. धूम्रपानाबाबत शासनाचे नियम, धूम्रपानच्या दुष्परिणामाविषयी झालेली जागरू कता, जडणारे आजार यामुळे विड्या ओढणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झाले. त्याचबरोबर कंपन्यांतील वाढत्या स्पर्धेतून विडीच्या किमतीत सिगारेट मिळू लागली. शासनाने तंबाखूवर मोठया प्रमाणात शुल्क आकारल्याने कारखानदारांनाही हा व्यवसाय फायद्याच्या राहिला नाही. त्यातच राजकारणाने त्यात शिरकाव केला. विडी कामगारांनी मजुरी वाढविण्याबरोबरच त्यांना अन्य सोयीसुविधा पुरवण्यासाठी आंदोलन उभे झाले. विडी कामागारांच्या संघटना तयार झाल्या.मजुरांची होतेय फरफटविडी उद्योगावर अवकळा आल्याने आणि कंपन्यांतील उद्योग गुंडाळल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांची अक्षरश: फरफट सुरु आहे. बिड्या वळण्याशिवाय दुसरे काम जमत नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतेक मजूर आता शेती काम आणि अशाच मोलमजुरीच्या कामावर जात आहे. तेंदूपत्ताचे पुडे करणे, पाने कापणे, विड्या वळणे, कट्टे किंवा चुंगळ््या तयार करणे, ही कामे बैठ्या स्वरुपाची असल्याने शेकडो मजुरांना मणक्याचे आजार जडले आहेत. शिवाय सातत्याने तंबाखूच्या संपर्कात असल्याने अनेक जण फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. विडी मजुरांसाठी भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि भंडारा येथे कामगार खात्याचे रुग्णालय असले तरी, त्याचा कोणताही लाभ मजुरांना होत नाही.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी