शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

भिलेवाडा-खडकी रस्ता भोगतोय मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:49 IST

भंडारा या जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणाºया भिलेवाडा ते खडकी रस्त्याची पार एैसीतैसी झालेली असून अनेक वर्षांपासून मरणयातना भोगत आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : उत्तम कळपते यांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): भंडारा या जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणाºया भिलेवाडा ते खडकी रस्त्याची पार एैसीतैसी झालेली असून अनेक वर्षांपासून मरणयातना भोगत आहे. खोल खड्डे, आडव्या नाल्या, धोकादायक रस्त्याच्या कडा व तुटलेल्या पुलांच्या रॅलींगमुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा झोपत आहे. विभागाला आणखी बळी तर हवे नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करीत त्वरीत रस्ता दुरुस्तीची मागणी जि.प.सदस्य उत्तम कळपते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.राज्याच्या मागील अर्थसंकल्पात भिलेवाडा ते खडकी मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. सदर निधी अपूर्ण असून यात फक्त रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले जाणार असल्याचे विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. संपूर्ण रस्ता उखडलेला असून दुरुस्तीसह डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अभियंत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, पुरेसा निधी दिला जात नसल्याचे कारण समोर करीत विभाग रस्त्याच्या दुरावस्थेकडे डोळेझाक करुन आणखी मोठया अपघातांची प्रतिक्षा करीत असल्याचा आरोप जि.प. सदस्य उत्तम कळपते यांचा आहे.भाजपाचे सरकार लोकांना ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन देऊन सत्तेत आले. मात्र, नागरिकांचे ‘बुरे दिन’ आल्याचे दिसत आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे नागरिकांच्या व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम जाणवत आहे. निव्वळ खोटे भाषणे देवून तसेच लोकांना विकासाचे रंजक स्वप्न दाखवून दिशाभुल करण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्यामुळे लोकांत निराशेचे वातावरण आहे. भिलेवाडा ते खडकी सुमारे १८ किमी लांबीच्या रस्त्याची सालपटे निघाली आहेत. खोल खड्डे व आडव्या नाल्यांमुळे वाहन चालविणे दुरापस्थ ठरले आहे. रस्त्याच्या कडा पूर्णत: उध्वस्त झालेल्या असून कडेला वाहने थांबविता येत नाही. पावसाळ््यात तर कडेला वाहन थांबविल्याने अनेक वाहने उलटली. रस्त्यावर चिखल आल्याने घसरुन अनेकांना अपंगत्व आले. संपूर्ण रस्ताच खोल खडयांच्या गर्तेत बुडाला असतांना या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी गावागावात मोठमोठी भाषणे ठोकून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. लोकांना मात्र, रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे. भिलेवाडा ते खडकी मार्गावरील अनेक पुलांचे रेलींग तुटलेल्या आहेत. करचखेडा, सुरेवाडा, ढिवरवाडा व खडकी खेथील पुलाच्या रेलींग तुटलेल्या असतांना विभागाने दुरुस्तीचे सौजन्य दाखविलेले नाही. विभागाने त्वरीत दखल देवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जि.प. सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुरेखा फेंडर, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हितेश सेलोकर व नागरिकांनी केली आहे.