शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा ४.७५ लाख रुपयांची धाडसी चोरी

By admin | Updated: October 10, 2015 00:57 IST

साकोली-वडसा मार्गावर मुख्य रस्त्यालगत भरदिवसा एका शिक्षकाच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पाऊणे चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला.

लाखांदूर येथील घटना : चोरट्यांचा शोध सुरुलाखांदूर : साकोली-वडसा मार्गावर मुख्य रस्त्यालगत भरदिवसा एका शिक्षकाच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पाऊणे चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना आज शुक्रवारला घडली. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.विवेक मेश्राम हे शिक्षक असून त्यांची पत्नीसुध्दा शिक्षीका आहे. सकाळी दोन्ही मुली बाहेरगावी निघून गेल्यानंतर हे शिक्षक दाम्पत्य दोघेही शाळेत गेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन्ही मुली घरी परतल्यानंतर त्यांना समोरचे दार उघडे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता दोन्ही कपाटाची दारे उघडे दिसून आले. सोने-चांदीचे डब्बे अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना तातडीने कळविले. पोलीस निरीक्षक देवीदास भोयर व सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंभरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. विवेक मेश्राम यांच्या तक्रारीवरुन सोन्याचे दागिणे आणि रोख १० हजार असे मिळून एकूण ४.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि ४५४, ३४० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला बोलाविले. मात्र चोरट्यांचा शोध घेण्यास श्वान पथकाला अपयश आले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी झाल्यामुळे लाखांदुरात भीतीचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)