शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भंडारा येथे ‘बीआरएसपी’चे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:15 IST

इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनात दिला.

ठळक मुद्देइंधन दरवाढ रद्द करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनात दिला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारला सकाळी ११ वाजतापासून धरणेला प्रारंभ झाला. यावेळी विदर्भ प्रदेश महासचिव झेड. आर दुधकुवर, महासचिव श्रावण एम भानारकर, जिल्हा प्रभारी डॉ. महेंद्र गणवीर, मनोज बन्सोड, सुरेश मोटघरे, कन्हैया शामकुवर, महेश मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले. त्यांनी दिवसेंदिवस डिझेल पेट्रोल, सिलिंडर गॅसची दरवाढ देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या घाईत नेऊन टाकणारी आहे. या दरवाढीसोबतच टोलनाक्यावर ट्रान्सपोर्टींग करणाऱ्या वाहनांकडून होत असलेली वसुली देशात महागाईला वाढीस लावणारी आहे. जनतेच्या श्रमातून होणाऱ्या धनाची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. याला भाजपचे सरकार कारणीभूत आहेत. येत्या काळात भारतीय जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा सज्जड दम यावेळी देण्यात आला. उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासन विरोधी घोषणा केली. शासनाने आंदोलनाची त्वरित दखल घेवून इंधन दरवाढीत २० ते २५ रुपयांनी घसरण करावी, टोलनाक्यावरील वसुलीमध्ये योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. निवेदनाच्या प्रती पेट्रोलियम मंत्री व महाराष्टÑाचे मुख्यमंत्री यांना पाठविले. आंदोलनात शैलेश जांभुळकर, प्रेमानंद गोस्वामी, गौतम रामटेके, अमित जनबंधू, राष्टÑपाल हुमने, गौतम रामटेके, विनोद उके, प्रल्हाद रामटेके, हरिश्चंद्र ठाकरे, धम्मदीप साखरे, आदीनाथ गेडाम, एम. टी. रामटेके, अंकित सहारे यांच्यासह बीआरएसपीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.