दुर्लक्ष नको : एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकतेभंडारा : ऋतू बदलल्याने सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले यामुळे त्रस्त आहेत. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.सर्दी, खोकला, कणकणल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे या 'सिझनल अँलर्जी'ना 'वैद्यकीय भाषेत हायनायिटज' म्हणतात. या आजाराच्या रुग्णांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. याचा नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. यशवंत लांजेवार यांचे आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत या आजाराचे लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जेव्हा ऋ तू बदलतो त्यावेळी खोकला येणे नाकातून पाणी यणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंगदुखणे आदी त्रास डोक वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने याचा सर्वात जास्त त्रास होतो. ब्राँकायिटससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजारही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवून खावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. मागील काही दिवसांत डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या रोडावली आहे, असेही ते म्हणाले. (नगर प्रतिनिधी) जंतुसंसर्गाने घसा खवखवतोजरासाही जंतुसंसर्ग झाला की, निरोगी व्यक्तींनाही घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन ते चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. संपर्कात आलेल्या व्यक्तीला जंतुसंसर्ग झाला असेल तर तो निरोगी व्यक्तीकडे येऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये कोणी शिंकला, खोकलला तर त्याचाही संसर्ग होऊ शकतो. जंतुसंसर्ग होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे, हवेचं प्रदूषण. रस्त्यांवरची धूळ, बांधकामांमधील वाळू, सिमेंट, पीओपी या वस्तूंच्या आपण सान्निध्यात येतो. या वस्तूंची ज्यांना अँलर्जी असते, घसा आणि नाकावर परिणाम होतो. बाहेरचं खाणं हेही जंतुसंसर्ग होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे.
सर्दी-खोकल्याने भंडारेकर त्रस्त
By admin | Updated: October 17, 2015 01:15 IST