शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara: भंडारा बाजार समितीत सत्ता कुणाची ? फैसला सोमवारला

By युवराज गोमास | Updated: May 21, 2023 16:35 IST

Bhandara News: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक २२ मे रोजी होणार आहे. निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप व शिंदे गट महाआघाडीत मुकाबला रंगला होता.

- युवराज गोमासे

भंडारा - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक २२ मे रोजी होणार आहे. निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप व शिंदे गट महाआघाडीत मुकाबला रंगला होता. परंतु, दोन्ही गटांना बहुमताचा आकडा न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राष्ट्रवादीने तीन अपक्षांना गळाला लावल्याने दोन्हींकडे ९ विरुद्ध ९ असे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाजार समितीत कुणाची सत्ता, कुरघोडीत कोण ठरणार वरचढ, असा प्रश्न जिल्ह्यात चर्चेत आहे.

भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी ९ संचालक काँग्रेसचे, तर राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाचे सहा संचालक तसेच तीन अपक्ष निवडून आले होते. काँग्रेसने प्रयत्न करूनही निवडणुकीत त्यांना बहुमत मिळविता आले नाही. काँग्रेस बहुमतापासून एका मताने दूर राहिली. दरम्यान, राष्ट्रवादीने सत्ताप्राप्तीसाठी तिन्ही अपक्षांना आपल्या गटाशी जोडल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे काँग्रेसने एक संचालक आपल्या गटाशी जोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर राष्ट्रवादीने अपक्षांना सोबत घेत काँग्रेसमधून निवडून आलेल्या संचालकांवर डोळा ठेवला आहे. सत्तास्थापनेसाठी फोडाफोडी होण्याची शक्यता दिसून येताच दोन्ही गटांकडून दक्षता घेतली गेली. दोन्ही गटांनी आपले संचालक देवदर्शनाला पाठविले आहेत. दुपारपर्यंत संचालक शहरात पोहचणार आहेत.

सभेच्या १० मिनिटांपूर्वी मिळणार नामनिर्देशनपत्रनामनिर्देशनपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सभेच्या ठिकाणी १० मिनिटे अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्राधिकृत अधिकारी शुद्धोधन कांबळे यांनी तशी विशेष टीप पदाधिकारी निवड सभेच्या नोटिसीमध्ये नोंदविली आहे. त्यामुळे ऐन नामनिर्देशनपत्र भरण्यावेळी नवनिर्वाचित संचालक हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सभेची विषय पत्रिका याप्रमाणेसभापती व उपसभापतिपदाकरिता नामनिर्देशनपत्र प्राधिकृत अधिकाऱ्याकडे सादर करण्याची वेळ दुपारी ३ ते ३:१५ पर्यंत राहील. छाननी ३:१५ ते ३:३० पर्यंत होईल. उमेदवारी अर्ज मागे घेणे ३:३० ते ३:४५ पर्यंत, आवश्यक असल्यास मतदान घेणे ३:४५ ते ४:१५ पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करणे मतदानानंतर लगेच, असा विषय पत्रिकेनुसार निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक