शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

नवोदयसाठी भंडारा वेटिंगवर

By admin | Updated: January 8, 2015 22:48 IST

भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या

दुर्लक्ष : साकोली येथील विद्यालयाचे नवेगावबांध येथे स्थानांतरणसाकोली : भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना उच्च व शहरातील नामवंत शाळेच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात आणण्यात आली. सद्यस्थितीला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी एकच नवोदय विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एकमेव नवोदय विद्यालय गोंदिया येथील नवेगावबांध येथे समाविष्ट झाले आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ ला प्रायोगीक तत्वावर जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्राच्या अमरावती येथे व दुसरी राजस्थानच्या झंझर येथे सुरु केली होती. या यशस्वी प्रयोगानंतर भारताच्या सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय स्थापन करण्याचे लक्ष्य भारत सरकारच्या मानव विकास विभागाद्वारे ठेवण्यात आले.यात तामीळनाडू हे एकच असे राज्य आहे की त्यात नवोदयाच्या शाळा उघडण्यास तेथील राज्य सरकारने विरोध केला. त्याला कारणही तसेच होते. भंडारा जिल्ह्याकरिता साकोली येथे नवोदय विद्यालय देण्यात आले. येथे चार पाच वर्षे ही विद्यालय सुरळीत सुरु होती. मात्र मालकीची जागा नसल्याने शासनाने ही नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे हलविली. त्यावेळी भंडारा व गोंदिया ही दोन्ही जिल्हे एकत्र होती.मात्र १९९९ मध्ये जिल्ह्याची फाळणी झाली व ही नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यात त्यामुळे या नवोदय विद्यालयात भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.ज्या विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयात शिक्षण घ्यावयाचे असेल त्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे आयोजित प्रवेश पूर्ण परीक्षा द्यावी लागते. यात परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदाच घेतली जाऊन परीक्षा नि:शुल्क असते. (तालुका प्रतिनिधी)