शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महोत्सवात भंडाऱ्याचा तांदूळ

By admin | Updated: January 16, 2017 00:30 IST

नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले.

२७.५० लाखांचे तांदूळ विक्री : हिराणखी वाणास शंभर रूपयांचा दरभंडारा : नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले. यापैकी सेंद्रीय शेतीच्या १८ गटाच्या ५५० शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभाग नोंदवून ३४ टन तांदळाची विक्री केली.या महोत्सवास नागपूर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. तांदुळ व संत्रा महोत्सवात आत्मा भंडारा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी बचतगटांनी उत्पादित केलेल्या सेंद्रीय तांदळाचे विविध वाण व इतर शेतमालाची विक्री हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. यात भंडारा जिल्ह्यातून लुप्त झालेले हिरानखी, सुगंधीत चिन्नोर, जयश्रीराम प्रणाली, केशर हे वाण ग्राहकांच्या पसंतीचे ठरले. भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील भदुजी कायते यांनी उत्पादित केलेल्या हिरानखी या सुगंधित तांदळाच्या वाणाला ८० ते १०० रूपये प्रती किलोग्रॅम दर मिळाला. या वाणसाठी अनेक ग्राहकांनी पुढील वर्षासाठी अग्रिम बुकींग करून घेतले.या तांदुळ महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या ३० गटांपैकी १८ गट हे परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती क्लस्टर असून उर्वरित गट हे जिल्ह्यातील आत्मांतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती उत्पादने तयार करणारे आहेत. महोत्सवासाठी भंडारा व नागपूर येथील आत्माचे प्रकल्प संचालक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली. (जिल्हा प्रतिनिधी)५५० शेतकऱ्यांचा सहभागया तांदूळ महोत्सवात ५५० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सेंद्रीय शेतमालाची विक्री केली. यात ३४ टन तांदूळ, ७० क्विंटल गुळ, २० क्विंटल हळद, ४ क्विंटल तीळ, ९ क्विंटल विविध प्रकारच्या डाळी, जवस तेल, मोहरी, धने, मिरची पावडर, गहू, मशरूम, सीताफळ अशा विविध प्रकारची शेती उत्पादनांची २७.५० लाख रूपयांची विक्री करण्यात आली.