शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदियात ११ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:48 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीचा बिगूल : उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना १८ मार्च रोजी जारी केली जाणार आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून २६ मार्च रोजी नामांकन अर्जांची छाणनी केली जाईल. तर २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. गत काही दिवसांपासून निवडणुकीच्या घोषणेची उत्सुकता लागली होती. रविवारी सायंकाळी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार भंडारा-गोंदिया मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २० लाख ५२ हजार ६१४ मतदार आहेत. आदर्श आचार संहिता रविवारपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात ईव्हीएमसह व्हीव्हीपॅड मशीन पुरेशा असून सर्व मशीनची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यात ९ लाख ७७ हजार ६१४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात १२ हजार ९३७ नवमतदार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२०६ मतदान केंद्र असून ईव्हीएम पुरेशी असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्रासह आयोगाने ठरवून दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. फोटो व्होटर स्लिप ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघात वाढले ४ लाख मतदारगत लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा चार लाख ९२८ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १६ लाख ५१ हजार ६८६ मतदार होते. यंदा २० लाख ५२ हजार ६१४ मतदारांची नोंद झाली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढल्याने निवडणूक विभागाने जारी केलेल्या मतदान यादीवरुन दिसून येत आहे.आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणीआदर्श आचार संहिता लागू झाली असून त्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकृत अ‍ॅपवर तक्रार दाखल करता येईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी खर्च मर्यादा ७० लाख रुपये असून जिल्हा निवडणूक विभाग प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.