शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 14:59 IST

१९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासून भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला. पांरपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघावर सातत्याने काँग्रेस व राष्टष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

ठळक मुद्देचारवेळा भेदला भाजपाने गड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासून भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला. पांरपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघावर सातत्याने काँग्रेस व राष्टष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात भाजपाने चार वेळा काँग्रेसला दणका दिला आहे. यात १९८९,१९९९,२००४ आणि २०१४ मध्ये हा मतदार संघ भाजपाने आपल्याकडे खेचून घेतला होता. या मतदार संघातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने १३ वेळा आपला खासदार लोसभेत पाठविला आहे. या शिवाय १९७७ मध्ये लक्ष्मणराव मानकर यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या मतदार संघातून प्रफुल्ल पटेल यांनी चार वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तर केशवराव पारधी व रामचंद्र हाजरणवीस यांनी दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे. १९८९ मध्ये डॉ.खुशाल बोपचे, १९९९ मध्ये चुन्नीलाल ठाकूर, २००४ मध्ये शिशुपाल पटले व २०१४ मध्ये नाना पटोले हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र नाना पटोले यांनी २०१८ मध्ये खासदार पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. त्यानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली.यात राष्टÑवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे निवडून आले.महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघाच्या रचनेनुसार अनुक्रमे अकरावा येणारा मतदार संघ म्हणजे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ. या मतदार संघात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचा याच मतदार संघात समावेश होता.मात्र पुनर्रचनेत देवरी-आमगाव मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला.

जातीय समीकरणावर निवडणुकाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पूर्वीपासूनच जातीय समीकरणाचा पगडा राहिला आहे.या मतदार संघात सर्वाधिक मतदार कुणबी व पोवार समाजाचे आहे. त्यामुळे या दोन समाजाच्या मतांच्या समीकरणावर उमेदवाराच्या विजयाचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यासाठीच सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना या दोन समाजाच्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जातो.

महिला उमेदवाराला प्रतिनिधीत्व नाहीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात आत्तापर्यंत झालेल्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांवर नजर टाकली असता या मतदार संघातून आत्तापर्यंत महिला उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी महिलांना अद्याप मिळाली नाही.मात्र यंदा प्रथमच या मतदार संघातून महिला उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला उमेदवार निवडून आल्यास या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्या पहिला महिला खासदार ठरणार आहेत.

दिग्गजांना पराभवाची धूळ चाखणार मतदार संघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.श्रीकांत जिचकार व प्रफुल्ल पटेल या दिग्गज उमेदवारांचा या मतदार संघातील मतदारांनी पराभव केल होता. त्यामुळे या मतदार संघाला इतिहास देखील आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक