शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदियाला मिळाले प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली.  रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, जुबलीयंट कंपनीनेसुध्दा इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द : कॅडिला कंपनीच्या संचालकांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा व गाेंदिया या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन शनिवारी उपलब्ध करून देण्यात आले. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली. रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, जुबलीयंट कंपनीनेसुध्दा इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सन फार्माने चार रुग्णालयांना ४०० इंजेक्शनचा पुरवठा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर केला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हीच बाब लक्षात घेत खासदार पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब खासदार पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. दोन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर खासदार पटेल यांचे लक्ष असून, ते याचा सातत्याने आढावा घेऊन आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

निर्धारित दरानेच   होणार पुरवठा  भंडारा व गाेंदिया जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनासुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसprafull patelप्रफुल्ल पटेल