शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजपथावर पथसंचलनात भंडाऱ्याच्या सुषमाने केले महाराष्ट्राचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:05 IST

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

ठळक मुद्देहलाखीच्या परिस्थितीत मिळवले यश

नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सुषमाला मिळालेली ही संधी भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात सुषमाचा जन्म झाला. आईवडील, दोन भाऊ आणि सुषमा असे पाचजण असलेल्या कुंभलकर कुटुंबाची उपजीविका ही रोजमजुरीवर आहे. अशातच बालपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड असल्यामुळे सुषमाने पहिल्यांदा धावण्याची आवड स्वत:मध्ये निर्माण केली. पुढे हीच आवड सैन्यात जाण्यासाठी प्रेरणादायी ठरली. प्राथमिक शिक्षण बेटाळा जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय बेटाळा, महाविद्यालयीन शिक्षण नवप्रभात महाविद्यालय वरठी त्यानंतर भंडारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात निघाली. तिथे रांजणगाव येथे नोकरी करीत असताना मित्रमैत्रिणीकडून सैन्यात जाण्याची माहिती घेत राहिली. सैन्यात जाण्याची आवड स्वस्थ बसू देत नसल्यामुळे ड्युटी करून घरी परतल्यानंतर ती शारीरिक व्यायाम व लेखी परीक्षेचा रात्रंदिवस अभ्यास करीत होती. ती २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची उतीर्ण झाली.जिथे जाण्यासाठी तरूणही एकाएकी धजावत नाही, अशा ‘बीएसएफ’मध्ये तिची निवड झाली. आणि उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करून तिने आपले स्वप्न सार्थ ठरविले. आज ती राजस्थान राज्यात बिकानेर येथील १६ बीएन सेक्टरमध्ये कार्यरत आहे. ग्वाल्हेरमधील टेकानपूर बीएसएफ कॅम्पमध्ये तिच्यासह ४७ मुलींना बुलेट स्टंटचे प्रशिक्षण दिले जात आहे. एका ग्रुपमध्ये ४८ मुलींमध्ये महाराष्ट्रातील तीन मुली आहेत. त्यात सुषमा कुंभलकर रा.भंडारा, विजेता भालेराव रा.अमरावती, जयश्री लांबट रा.चंद्रपूर यांचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८