लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कमी पावसामुळे जलाशये भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबट, अस्वल, आदी प्राणी शेत शिवारासह गावात येऊ लागले आहेत. महिनाभरात वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या चार घटना घडल्या आहेत.दुसरीकडे खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मतद तातडीने वाटप करण्याची मागणी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावालगतच जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट, अस्वल, चितळ, हरिण, सांभर, रानडुकर या वन्यप्राण्यांचा नेहमीचा परिसरात वावर असतो. जंगलालगत शेतजमीन असल्याने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठया प्रमाणावर नासाडी करतात. रबी हंगाम रानडुकरांचे कळप सर्व शेतच फक्त करतात. तसेच गावात शेतातील जनावरांवर हल्ले करून ठार करतात.मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्याही विस्तारत असल्याचे पुढे आले आहे. शेळ्या, मेंढया हे पाळीव प्राणी वन्यप्राण्यांनी फस्त केले. हा संघर्ष कसा आटोक्यात येणार यावर दोन्ही घटकांचे अस्तित्व अवलंबून आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संघर्षाची घटना सातत्याने वाढत आहेत. नागरी वसाहतीत शिरकाव करणाºया वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. वन विभागाने या वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यांची सोय केली असली तरी ती पुरेशी नाही. वनविभागाने वन्य प्राण्यासाठी जंगल, वनतळे व शिवकालीन विहिरिची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील अभयारण्यातील वन्यजीवांची गावाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:27 IST
कमी पावसामुळे जलाशये भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबट, अस्वल, आदी प्राणी शेत शिवारासह गावात येऊ लागले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील अभयारण्यातील वन्यजीवांची गावाकडे धाव
ठळक मुद्देपिकांचेही नुकसानवनातील पाणवठे नावापुरतेच