शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संशयीत ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन आणि १४ व्यक्तींना नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करुन जिल्ह्यातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी, अ‍ॅटो रिक्क्षा, कार,जीप, सुमो ट्रॅवल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध उपाययोजना : भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणारी वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी आदेश देवूनही नागरिक रस्त्यावरच येत असल्याने अखेर सोमवारी भंडारा जिल्हा लॉकडाऊन करण्यातआला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. जे. प्रदिपचंद्रन यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सोमवार रात्री ८ वाजतापासून जिल्ह्यातील सर्व वाहने तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना संशयीत ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन आणि १४ व्यक्तींना नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करुन जिल्ह्यातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी, अ‍ॅटो रिक्क्षा, कार,जीप, सुमो ट्रॅवल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा, अधिकारी, कर्मचारी, किरणा माल, भाजीपाला, दूध, औषधी, स्वास्थ्य सेवेची वाहने वगळण्यात आली आहे. तर दुसºया आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धर्म, जातीचे देवस्थान, मंदिर, धार्मिक संस्था सार्वजनिक ठिकाणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.रविवारी आयोजित जनता कफर्यू नंतर सोमवारी सकाळपासूनच नागरिक रस्त्यावर निघाले होते. पोलीस वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर दिसत होते. दरम्यान सायंकाळी राज्यात संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या. आंतरराज्यीय सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशाकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरण्यात आले आहे. तर भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणारी सर्व वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे.भंडारातील अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्सकोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून नागरिकांना जाणे-येणे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, मोठा बाजार मार्ग, खांब तलाव चौक, किसान चौक यासह शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. पोलिसांचे वाहन सारखे सूचना देत शहरातील विविध मार्गावरुन फिरताना दिसत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, घरातच बसून राहावे, असे आवाहन केले जात आहे. भंडारा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पध्दतीने बॅरिकेट्स लावून वाहतूक अडविण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश पोलिसांकडून दिले जात आहे.आॅनलाईन बँकीग जागृतीजिल्ह्यातील सर्व बँका पत संस्थानी रोख भरणा व रोख काढणे प्राध्यान्याने करावी, ग्राहकांना कमीत कमी वेळ बँकेत उभे राहता येईल, अशी व्यवस्था करावी तसेच आॅनलाईन बँकीगबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.