शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

भंडारा जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:56 IST

गत चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल जंगल आणि जमीन संवर्धन, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भरण प्रकल्प यावर आधारित जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने कृषी विकास, दुग्ध उत्पादन, रेशीम विकास, मत्स्यव्यवसाय, रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

ठळक मुद्देमहादेव जानकर : भंडारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सभारंभ, चित्ररथ ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल जंगल आणि जमीन संवर्धन, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भरण प्रकल्प यावर आधारित जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने कृषी विकास, दुग्ध उत्पादन, रेशीम विकास, मत्स्यव्यवसाय, रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. शासनाने मागील चार वर्षात जिल्ह्याच्या विकासाला गती दिली असून या पुढेही जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.प्रजासत्ताक दिनाच्या ६९ वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सभारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित होते.ना. महादेव जानकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने सर्वात मोठी कर्जमाफी योजना जाहिर केली आहे. या योजनेत भंडारा जिल्ह्यातील ८२ हजार ७१० शेतकरी सभासदांना २४३ कोटी १६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात २०१ गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी मिळून पूर्ण केलेल्या कामामुळे ४७ हजार ९२२ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला असून त्यामधून जिल्ह्यातील एकूण ३९ हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. मागील तीन वर्षात पूर्ण झालेल्या कामावर ९० कोटी ४३ लक्ष ८७ हजार निधी खर्च झाला आहे. २०१८-१९ मध्ये १४० गावांची निवड करण्यात आली असून प्रशासनाने ६९ कोटी ४ लाख रुपयाचा आराखडा तयार केला आहे. २२२७ कामे प्रस्तावित असून ९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे लक्ष निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कृषिपंप योजनेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ७ हजार ९५६ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, सौर कृषिपंप ऊर्जीकरण योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना, तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऊर्जा विकासाला गती मिळाली आहे.भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या उपलब्ध जलसाठयाचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी करण्यात येत आहे. मत्स्यजीरे उत्पादनात राज्यात जिल्हा अग्रेसर असून यावर्षी मच्छीमार सहकारी संस्था आणि शिवणीबांध येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राद्वारे डिसेंबर अखेर १८ कोटी ८५ लक्ष मत्स्यजीरे निर्मिती केली आहे.२०२२ पर्यंत सर्वांना घरे या अंतर्गत २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये ७ हजार १६० लाभार्थ्यांना, रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना ६ हजार ८७ व शबरी आदिवासी घरकुल अंतर्गत १२० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २ हजार ९२७ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, स्वच्छ भारत अभियान, मनरेगा, सातबारा संगणकीकरण, भूमिधारी ते भूमिस्वामी, पशुसंवर्धन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अन्य महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आल्या. सामान्य नागरिकांचे हित डोळयासमोर ठेवून शासन यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला गती देईल, असे ना. महादेव जानकर यांनी सांगितले.यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी पथक व विद्यार्थ्यांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. निवडणूक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस विभाग, रेशीम कार्यालय, पाणी पुरवठा व स्वच्छता, कुष्ठरोग जनजागृती , जलयुक्त शिवार, मोफत व सक्तीचे शिक्षण, जनावरांसाठी पौष्टिक आहार, अपारंपारिक उजेर्चा वापर व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जनजागृती, हेल्मेट सक्ती, विद्युत विभाग, उडान, फिरते पोलीस ठाणे, या विषयावर चित्ररथ काढण्यात आले.विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले.संगणकीय प्रणालीजिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता, प्रभावीपणा आणि लोकाभिमूखता या करीता ई-आॅफिस या संगणकीय प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. शासकीय कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे करण्याच्या या अभिनव प्रकल्पासाठी ना. जानकर यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.