शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; सात घरांची पडझड, १२ हेक्टरमधील पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2023 18:38 IST

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका बसला आहे. 

इंद्रपाल कटकवार 

 भंडारा : हवामान खात्याचा अंदाज पुन्हा रविवारी खरा ठरला. दुपारी अडीच वाजतापासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट पडली. विशेषत: वादळी वाऱ्याने घरांचे व कडधान्यासह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. एकट्या लाखांदुर तालुक्यातील तीन गावांमधील सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

२५ व २६ मार्चला अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शनिवारी दुपारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. शनिवारी आलेल्या पावसापेक्षा रविवारी दुपारी अचानकपणे हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने अतोनात नुकसान केले आहे. कडधान्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे मुसळधार पाऊस बरसला. गहु, चना, लाखोरी पिकाला याचा फटका बसला आहे. दुपारी २ वाजतापर्यंत उन्ह तापले असताना वातावरणात अचानक बदल झाला. तुमसर व मोहाडी तालुक्यातही दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपुन काढले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. लाखनी येथे गारपीटीसह पाऊस बरसला. पवनी, लाखांदुर, साकोली येथेही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर परिसरातही पाऊस बरसला. ऑटोवर कोसळला वृक्षवादळी वाऱ्यामुळे तुमसर पोलिस स्टेशन जवळ असलेल्या ऑटोस्टँडवर उभ्या असलेल्या ऑटोवर वृक्ष कोसळला. सुदैवाने यावेळी आऑटोमध्ये कुणी नसल्याने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.मात्र ऑटोचे मोठे नुकसान झाले. तसेच खापा येथे वादळामुळे तुमसर-भंडारा राज्यमार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. ग्रामस्थांनी झाड बाजुला केल्याने वाहतुक पुन्हा सुरळीत झाली. वादळामुळे खापा येथील सापुजी भोयर यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला. यात तीन जनावरे जखमी झाली. मोहाडी तालुक्यातील जांब येथे धनराज श्रीपात्रे यांच्या घरावरील टिनाचे छत उडुन गेले. पाणी घरात शिरल्याने जीवनोपयोगी साहित्यांची नासाडी झाली.

 लाखांदुर तालुक्यातील सात घरे पडलीशनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.तसेच गवराळा येथे दोन घरे, खैरी पट येथील दोन तर दहेगाव येथील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच चिचाळ व दहेगाव येथील प्रत्येकी दोन हेक्टरमधील मका पिकाची नासाडी झाली. तर खैरी पट येथे आठ हेक्टरमध्ये लावलेला मका पीक भुईसपाट झाले.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराRainपाऊस