शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे७० कोटी मंजूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या निधीतून ५.८ किमी रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे आता भाग्य फळफळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५.८ किमी हायवे आता फोरवे होणार आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ही माहिती दिली. भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना  दिली.या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते. 

सहा महिन्यात  १५८ रस्ते अपघात- जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीपेक्षा अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग