शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भंडारावासी दूषित पाणी पिण्यास बाध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:25 IST

शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : विविध आजारांना खतपाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या उपरही भंडारावासीयांना दूषित पाणी पिण्यास पालिका प्रशासन बाध्य करीत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठे काळेकुट्ट पाणीपुरवठा तर कुठे पाण्यासाठी बोंब ही बाब नित्याचीच झाली आहे.दीड लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भंडारा शहरात पाण्याची ही मुख्य समस्या आहे. परंतु ही समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन सपेशल फेल ठरली आहे. सत्ता कुणाचीही असो, मुलभूत सुविधांच्या विशेषत: जल हे जीवन आहे, असे म्हणत असतानाही शुद्ध पाण्याच्या पुरवठेबाबत पालिकेने कधीही गांभीर्याने घेतले नाही. दोन दशकांपासून पाण्याची समस्या हळूहळू उग्र रूप धारण करीत असताना भविष्यकालीन वाढीव पाणीपुरवठा योजना कागदावरच रंगविण्यात आल्या.नवीन योजना मंजुर व्हायला व कार्यान्वीत व्हायला बराच कालावधी शिल्लक असताना तोपर्यंत नागरिकांनी फेसाळयुक्त व घाण पाणी प्यायचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे. पाण्यासाठी पालिकेसमोर आंदोलन करणारेही आता का बोलत नाही, हा मुख्य प्रश्नही भंडारेकरांना सतावत आहे.युद्ध पातळीवर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी लिकेज शोधत असले तरी त्यावर कधीही शंभर टक्के निराकरण होणे अशक्य बाब आहे. जलशुद्धीकरणाची क्षमताही योग्य असली तरी कालबाह्य झालेल्या जलवाहिन्यांमुळे हजारो नागरिकांचा जीव दूषित पाण्यामुळे धोक्यात आला आहे.शहरातील मोठा बाजार परिसर, माधवनगर परिसर, खात रोड, शुक्रवारी परिसर, मेंढा परिसरासह शहरातील बहुतांश भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकारशहराच्या पूर्व उत्तर दिशेला वसलेल्या मेंढा परिसरात मागील दहा दिवसांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. नागरिक पाण्यासाठी तरसत असताना पालिका प्रशासनाचे दुटप्पी धोरण नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. महिला-पुरूष सकाळपासून पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसून येतात. याबाबत पालिका प्रशासनाला कळवूनही पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही.