शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याची महिला बनली पहिली वनपरिक्षेत्राधिकारी

By admin | Updated: June 1, 2017 00:28 IST

आज महिलांनी विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ओळख निर्माण करीत आहेत.

लोकमत शुभवर्तमान : साकोली वन कार्यालयात होणार रूजू लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आज महिलांनी विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ओळख निर्माण करीत आहेत. त्यात आता शासकीय अधिकारीही मागे नाहीत. भंडारा वन विभागाच्या इतिहासात वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) या पदावर पहिल्यांदा जिल्ह्यातील एक महिला अधिकारी रुजू होत आहे. आरती रमेश ठाकरे असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या लवकरच साकोली वन कार्यालयात रूजू होणार आहेत.सन २००६ मध्ये आरती ठाकरे या वन विभागात वनपाल म्हणून रूजू झाल्या. त्यावेळी त्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव वनपाल होत्या. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी (वाही आगार), साकोली वनक्षेत्र, गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी क्षेत्रात सेवा बजावली आहे. विद्यमान स्थितीत त्या कोका अभयारण्याच्या उसगाव क्षेत्रात कार्यरत आहेत. दि. २९ मे रोजी वन विभागाने राज्यातील ७८ वनपालांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीची यादी जाहिर केली. त्यात आरती ठाकरे यांची पदोन्नती करून त्यांच्यावर साकोली वनपरिक्षेत्र कार्यालयाची धूरा सोपविण्यात आली आहे. त्या लवकरच रूजू होणार आहेत. तथापि, भंडारा जिल्ह्यातील त्या पहिल्या वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. साकोली तालुका हा वनसंपदेने संपन्न असून येथील वनाचे संवर्धन व संरक्षण करणे हीच आपली प्राथमिकता राहील, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिली.