शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘भंडारा बनेगा मंच’ आज नाविन्यपूर्ण कार्यक्रम

By admin | Updated: May 5, 2017 00:44 IST

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘भंडारा बनेगा मंच’

भंडारा : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘भंडारा बनेगा मंच’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आज सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे कलाकारांंना प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘भंडारा बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार. विजेता तेही तुमच्या नजरेसमोर हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता नॅशनल हायवे स्थित मारोती शो रूमच्या बाजूला "मंगलम सभागृहात" आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल. हाच कार्यक्रम महाराष्ट्रात कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित आता महाराष्ट्र बनणार मंच, ज्यात सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिमनॅस्टिक, आॅक्रेस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारूड, खंजिरी वादन, ढोल पथक इत्यादी व यासारखे कलाप्रकार सादर करता येईल. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे. कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नाविन्यपूर्ण शो चे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. एका टॅलेंट शो ला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मे पासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या अंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे.आपल्या शहरात शुक्रवारी (दि.५) या दिवशी ‘भंडारा बनणार मंच’ होत आहे. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी सीमा नंदनवार ८०८७१६२३५२, ललित घाटबांधे ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क करा. स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे. (मंच प्रतिनिधी)