शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

पावसाळ्यात सापांपासून सावधान; जिल्ह्यात विषारी सापांच्या चार प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापाचा समावेश होत असतो. अनेकदा शेतशिवार किंवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किंवा वनविभागाला कळवावे. विशेष म्हणजे विषारी व बिनविषारी साप कोणते हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते.

ठळक मुद्देसापांबद्दल जनजागृती महत्वाची

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत काही वर्षांत नागरीकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. साप हासुद्धा एक जीवच आहे. मात्र, पावसाळा सुरू होताच साप आढळण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी साप आढळल्यास घाबरून न जाता सावधान होणे आवश्यक आहे. वेळीच सर्पमित्राला पाचारण करणे योग्य आहे.सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापाचा समावेश होत असतो. अनेकदा शेतशिवार किंवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किंवा वनविभागाला कळवावे. विशेष म्हणजे विषारी व बिनविषारी साप कोणते हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. पावसाळ्यात निघणारे साप हे बहुधा बिनविषारी असतात. मात्र, अनेकदा सापाने दंश केला म्हणून नागरिक मनावर ताण घेतात. भीतीपोटी प्रचंड त्रास करून घेतात. याचाच आघात शरीरावर होऊन वेळप्रसंगी जीवही जातो. त्यामुळे तत्काळ सर्पमित्रांना बोलावून सापाला पकडण्यात हीच महत्त्वाची बाब आहे.

  साप आढळला तर...

घरापरिसरात किंवा कामाच्या ठिकाणी साप आढळला तर त्याच्यावर हल्ला चढवायचा हे योग्य नाही. साप हा अतिशय शांत असतो. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते तेव्हाच तो दंश करतो. ही बाब आपण समजून घ्यायला हवी, असे सर्पमित्र सांगतात.साप दिसताच घाबरून जावू नका. तत्काळ सर्पमित्राला संपर्क करा. साप हा शांत प्राणी असल्याने विनाकारण त्याला डिवचू नका. सर्पमित्र किंवा वन कमर्चारी येइपर्यंत गोंधळ वा हलचल करू नका. बंदखोली साप आढळला असेल तर दारे, खिडक्या बंद करून घ्या, जेणेकरून साप एकाच ठिकाणी राहील.

घाेणस... घोणस हा जाडसर आणि बोजड शरीराचा साप असून सु. १.६ मी. लांबीचा असतो. शरीराच्या मधल्या भागाचा घेर सु. १५ सेंमी. असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान शल्क (खवले) असतात.

साधा मण्यार...  पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत साधा मण्यार (बंगारस सीरुलियस) आढळतो. तो वनांत राहणे पसंत करतो. पूर्ण वाढ झालेल्या मण्याराची लांबी ९०–१२० सेंमी. किंवा अधिक असते.शरीर पोलादी निळ्या रंगाचे व विष अत्यंत जहाल असते.

नागराज... आकाराने सर्वांत मोठा विषारी साप. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना  आहे. त्याच्या नावात जरी नाग हा शब्द असला तरी तो सामान्य नागाहून (कोब्रा) वेगळा आहे.  महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आसामात आढळतो. तो हल्लेखोर आणि चपळ साप आहे.

पट्टेरी मण्यार... हा कैरात प्रकारचा साप असल्यामुळे कैरातांची बहुतेक लक्षणे यात आढळतात.  हा साप बराच मोठा व दिसायला सुबक असतो.  शरीरावर एकाआड एक असे काळे व पिवळे पट्टे असतात. मानेवर एक काळी खूण  असते. इतर साप खाऊन हा आपली उपजीविका करतो.

साप चावला तर... - एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये. कारण माणूस घाबरतो तेव्हा त्याचे हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे विष अजून गतीने शरीरात पसरतं. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. ज्या जागी साप चावला तो भाग दोरीने बांधून ठेवा ज्यामुळे विष अजून शरीरात पसरणार नाही. यानंतर साप जिथे चावला आहे त्या भागाच्या आजूबाजूला दाबून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.  जर माणसाचं शरीर काळे पडायला सुरुवात झाली तर समजा विष शरीरात पसरलं आहे. लगेच त्या व्यक्तीला रुग्णालयात न्यावे.

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी सापभंडारा जिल्ह्यात विरोळा (तास्या), पाणदिवड, धोंड्या, धामण, अजगर, डुरक्या घोणस, मंडोळ,, रूखइ, धुळनागीण, तस्कर, तिडक्या, कवड्या, पट्टेरी कवड्या, गवत्या, वाळा, पोवळा आदी बिनविषारी साप आढळतात. या प्रजातीच्या सापांनी दंश केला तरी कुठलाही परिणाम शरीरावर होत नाही. पण कित्येकदा साप चावला या भितीपोटी नागरिकांचा नाहक जीव जातो.

 साप हे मानवाचे शत्रू नाहीत. त्याला मित्र म्हणूनच बघितले पाहिजे. कुठेही साप आढळल्यास त्याची माहिती जवळच्या सर्प मित्राला द्यावी. जेणेकरून वेळप्रसंगी येऊन सर्पमित्र त्या सापाला पकडून जंगलात सोडू शकतो. साप दिसल्यास एकदम घाबरून जाऊ नये किंवा सापाने दंश केल्यास नियमित माहीत असलेल्या उपाययोजना कराव्यात.-योगेशकुमार पशिने, सर्पमित्र,भंडारा.

 

टॅग्स :snakeसाप