शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत श्रेष्ठ रुग्णसेवा, तीच खरी देशसेवा

By admin | Updated: February 4, 2016 00:43 IST

हुतात्मांच्या आठवणी जतन करणे आज सर्वसामान्य जनतेची गरज आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ...

रामचंद्र अवसरे : कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभभंडारा : हुतात्मांच्या आठवणी जतन करणे आज सर्वसामान्य जनतेची गरज आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी पदावर कार्य भुषवतील, परंतु विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा, देशसेवा या बाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकवृदांनी विद्यार्थ्यांना कौशल्यशिल ज्ञान द्यावे. सेवेत श्रेष्ठ रुग्ण सेवा तीच खरी देश सेवा आहे. गावातील दारु विक्री बंद करणे आवश्यक आहे तरच जनतेच्या सहकार्यातून स्मार्ट ग्राम संकल्पना साध्य करणे शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. तालुका कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभ पहेला येथे करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल शेंडे, प्राचार्य एस.डब्ल्यु. थेरे, डॉ. रवी कापगते उपस्थित होते. आमदार अवसरे यांचे हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. रॅलीचे पथ संचलन पहेला गावातून करण्यात आले. रॅलीत कुष्ठरोगाबाबतची जनजागृती करण्यात आली. जनजागृती मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा अयोजित करण्यात आली. त्यामध्ये गांधी विद्यालय, पहेला येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र व रोख बक्षिस देण्यात आले. यात प्रथम पुरस्कार आस्था बांडेबुचे, द्वितीय पुरस्कार तेजस्विनी कायते तर तृतीय पुरस्कार आदीत्य चौधरी यांचा समावेश आहे. प्रस्ताविक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. वाय.बी. कांबळे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यात २०१५ या वर्षात ४१७ नवीन कुष्ठरुग्ण शोधून काढण्यात आले आहे. अजूनही समाजात लुप्त अवस्थेत कुष्ठरुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करीता तालुका कुष्ठरोग निवारण मोहिम प्रत्यक्ष सर्वेक्षण सर्व स्तरावर १३ फेब्रुवारीपर्यत करण्यात आले आहे. या मोहिमेत जनतेने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन शिक्षिका गिरडकर यांनी केले. आभार प्रविंद्र पडोळे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)