शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

५११ दिव्यांगांना मिळणार युनिक कार्डचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:15 IST

दक्षिण मध्य रेल्वे, नागपूर यांच्या विद्यमाने भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे दिव्यांगां करीता विशेष शिबीर घेण्यात आले. दोन दिवशीय शिबिरात ५११ दिव्यांगांची युनिक कार्ड करिता निवड करण्यात आली.

ठळक मुद्देभंडारा रोड रेल्वे स्थानक येथे विशेष शिबिर

ऑनलाईन लोकमतवरठी : दक्षिण मध्य रेल्वे, नागपूर यांच्या विद्यमाने भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे दिव्यांगां करीता विशेष शिबीर घेण्यात आले. दोन दिवशीय शिबिरात ५११ दिव्यांगांची युनिक कार्ड करिता निवड करण्यात आली. रेल्वेने प्रवेश करण्यासाठी या सवलत कार्डचा वापर करण्यात येतो. सदर कार्ड धारकांना सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवाशाकरिता वापरता येत असून आॅनलाइन तिकीट बुकिंग करताना सुद्धा उपयोगी पडणार आहे.कार्यक्रमास आमदार चरण वाघमारे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, भाजपच्या दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोकाला चौधरी, वरिष्ठ मंडळ अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळ वाणिज्य अधिकारी डी एस. तोमर, माजी सरपंच निरंजना साठवणे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी सभापती हरिश्चंद्र बधाटे, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल नारनवरे, रवी लांजेवार, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सी के टेम्भूर्णीकर उपस्थित होते.यावेळी भंडारा सामान्य रुग्णालयाचे मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ रत्नाकर बांडेबुचे, डॉ प्रदीप आनंद, डॉ विनोद गडसिंघ, डॉ प्रदीप आकरे, विकास गभणे, स्नेहा मेश्राम व माधुरी साखरवाडे यांनी दिव्यांगांना पडताळणी केली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी हजेरी लावली होती. अपुरी व्यवस्था व कार्डसाठी झालेली गर्दी लक्षात ठेवून रेल्वे विभागाने एक दिवसाची वाढ करून शिबीर घेण्यात आले. दोन दिवसात एकूण ५११ दिव्यांगांची आवश्यक ती कागदपत्र तपासून त्यांना युनिक कार्ड वाटप करण्यासाठी असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. लवकरच सर्व दिव्यांगांना युनिक कार्ड वाटप करण्यात येतील.