शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:36 IST

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द ...

ठळक मुद्देगोसेखुर्द पुनर्वसन विभागाचा फतवा : अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १.११९ कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला. लाभ देतेवेळी निवाडा हा मुख्य घटक धरण्यात आला होता. परंतु एका एकाच कुटुंबात अनेक विवाहित कुटुंब वास्तव्य करीत होते. अशा कुटुंबाना वाढीव कुटूंब म्हणून गणना केली गेली. वाढीव कुटुंबांना सुद्धा नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कमेचा लाभ देण्याचा शासनाचा विचाराधीन होता.त्या संदर्भात आदेश काढून २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झालेले असावे. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे. बाधित गावाचा रहिवासी असावा, अशी अट घातलेली आहे.याशिवाय विवाहित भाऊ किंवा मुलगा यांचे कुटुंब वाढीव कुटुंबात समावेश असेल, असा कुटुंबानीच वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.प्रकल्प बाधीत वाढीव कुटुंबानी एकमुस्त रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेकडे प्रस्ताव सादर केला.ग्रामपंचायतची विवाह नोंदणी प्रमाणपत्र मला मान्य नाही. लग्न झालेल्या वर्षीच नोंदणी का केली नाही. अशी उत्तरे उपजिल्हाधिकारी भुसंपादन पुनर्वसन यांच्याकडून मिळतात.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील कर्मचाºयांना एका वर्षाच्या आत अपत्य झाली काय, लग्न होताच विवाहाची नोंदणी केली होती काय, असा संतप्त सवालही प्रकल्पग्रस्तांना विचारला जात आहे. यासाठी वाढीव कुटुंबानी रकमेसाठी प्रस्ताव सादर करून मोबदला मिळवून द्यावा, अशीही प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.लग्नतारखेनंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाले असेल तरच २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झाले, असे ग्राह्य धरून वाढीव कुटुंबाना एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात येईल. अटीत न बसलेल्या वाढीव कुटुंबाचे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत.-जी.जी. जोशी, उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग (विशेष) भंडारा.