शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार लाभार्थ्यांना मिळणार अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

By admin | Updated: October 23, 2016 01:05 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नवीन संगणकीकृत यादीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा तुमसर विधानसभा...

लाभार्थ्यांना दिलासा : तहसीलदारांना मिळाल्या सूचनाभंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नवीन संगणकीकृत यादीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा तुमसर विधानसभा क्षेत्रातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील अनुक्रमे १८ हजार व १५ असे ३३ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता.१ फेब्रुवारी २०१४ पूर्वीच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत होता. परंतु, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत उपरोक्त इष्टांकाच्या मर्यादेमुळे जे लाभार्थी सवलतीच्या दराने अन्नधान्याच्या लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. अशा राज्यातील उर्वरित १७७.१९ लाख लाभार्थ्यांना सार्वजनिक व्यवस्थेच्या प्रणालीत संगणकीकृत करण्यात आले आहे. डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयान्वये विहीत वार्षिक उत्त्पन्नाच्या मर्यादेनुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही. परंतु राज्यातील शिधापत्रिकांच्या व त्यावरील सदस्यांचा डिजीटलायझेशनच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता भंडारा जिल्ह्यातील इष्टांक शिल्लक असल्याचे आ.वाघमारे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही बाब समजावून सांगितली. त्यानंतर शासनाने जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याबाबतच्या कार्यवाहीचे संबंधित विभागाला निर्देश दिले. आता या योजनेत तुमसर तालुक्यात १८ हजार तर मोहाडी तालुक्यात १५ हजार इष्टांक वाढवून देण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. पात्र असलेल्या परंतु अन्न सुरक्षा योजनेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दखल घेण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर व मोहाडी तहसीलदारांना दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)