शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

१०.०५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:40 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात २.५ लाख शिधापत्रिकाधारक : बीपीएलच्या सर्व लाभार्थ्यांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.सदर योजनेंतर्गत तिहेरी शिधापत्रिका पध्दती संपुष्टात येऊन प्राधान्य कुटूंब योजना लागू केली आहे. यामध्ये बीपीएलचे १०० टक्के लाभार्थी तसेच केशरी शिधापत्रिका मधून ग्रामीण क्षेत्राकरीता ४४ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व शहरी क्षेत्राकरीता ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्हयातून एकूण ७ लाख ११ हजार ६५ पात्र लाभार्थ्यांची निवड करुन प्रती व्यक्ती ५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. अंत्योदय योजनाचे ६४ हजार ५८५ शिधापत्रिका मधील २ लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रती कार्ड ३५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे.दोन्ही योजनेत जिल्हयातील एकूण २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिका वरील लोकसंख्या १० लाख ५ हजार ३४८ एवढया लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न्न सुरक्षा योजनांतर्गत अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अजूनही ४१ हजार ७४१ केशरी शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत शासनास अवगत करण्यात आले असून वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आलेली आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतिक्षेत असलेल्या पात्र केशरी शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ देण्यात येईल.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतिक्षेत असलेल्या ४१ हजार ७४१ शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कुठलाही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.